लग्नात हळदी ऐवजी रक्ताचा सडा, 5 जणांवर चाकू हल्ला, हादरवून टाकणारी घटना..! video

 

Video लग्नाच्या आनंदी वातावरणाला अचानक हिंसाचाराचे गालबोट लागल्याची धक्कादायक घटना बुलढाणा तालुक्यातील कोलवड येथे घडली. कावड यात्रेदरम्यान झालेल्या जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभातच तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला. या घटनेत एकजण गंभीर जखमी झाला असून हल्ला करणारे आरोपी फरार आहेत. या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्लानंतर लग्न समारंभात एकच गोंधळ उडाला.  

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

गौरव गजानन जाधव हा युवक गावातील एका लग्न समारंभाला उपस्थित होता. लग्नसोहळा पार पडून पंगतीत जेवण सुरू असताना त्याचा गावातील नितीन सपकाळ याच्याशी वाद झाला. काही दिवसांपूर्वी कावड यात्रे दरम्यान दोघांमध्ये वाद झाल्याची पार्श्वभूमी होती. त्याच कारणावरून पुन्हा वाद चिघळल्याचे समोर आले आहे. वाद वाढताच आरोपी नितीन सपकाळ याने त्याच्यासोबत असलेल्या मयुरेश दसरकर याच्याकडील चाकू घेतला. त्यानंतर कसला ही विचार न करता त्याने गौरव जाधव याच्यावर सपासप वार केले. असा आरोप आहे. 

 

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

या हल्ल्यात गौरव जाधव गंभीर जखमी झाल आहे. हल्ला झाल्यानंतर त्याला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. तिथेच त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. भांडण सोडवण्यासाठी पुढे आलेले अरुण सुभाष जाधव यांनाही किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. तक्रारीनुसार या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बुलढाणा पोलिस करत आहेत. आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!