MPSC Recruitment 2026 apply online: महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांत भरती जाहीर करण्यात आली आहे. शासनाच्या विविध पाच विभागात तब्बल ४३८ पदांसाठी भरती होती आहे. या भरतीसंदर्भात जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा. बातमीत विभागनिहाय रिक्त पदांची यादी देण्यात आली आहे. यावरून कोणत्या विभागात जास्त रिक्त जागा आहेत हे समजेल. या भरतीमधून गट अ आणि गट ब ची पदे भरली जाणार आहेत.
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती २९ जुलै २०२५ रोजी जाहीर करण्यात आली आहे. आयोगामार्फत शासनाच्या आस्थापनेवरील बातमीत दिलेल्या संवर्गातील पद भरतीसाठी विहित ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. आयोगाकडून पाच जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, आदिवासी विकास विभाग, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग आणि शासनाच्या इतर विविध विभागांचा समावेश होतो. या विभागांमध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतींमधून
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
यामध्ये सर्वाधिक जागा ‘महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२५’ या जाहिरातीतून भरल्या जाणार आहेत. या भरतीमधून गट ब च्या तब्बल २८२ जागा भरल्या जाणार आहेत. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग अंतर्गत येणाऱ्या ‘औषध निरीक्षक, गट-ब, अन्न व औषध प्रशासन’ विभागात १०९ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत ‘अधीक्षक व तत्सम पदे, सामान्य राज्य सेवा, गट-ब’ च्या ३६ रिक्त जागा
कधीपर्यंत करता येणार अर्ज ?
वरील जाहिरातीमध्ये भरतीसंदर्भातील संक्षिप्त तपशील दिलेला आहे. अर्ज करण्याची पद्धत, प्रवर्गनिहाय तपशील, आवश्यक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत संबंधित परीक्षा योजना व अभ्यासक्रम, इत्यादीबाबतच्या सविस्तर तपशीलासाठी आयोगाच्या https://mpsc.gov.in व https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या माहितीचे तसेच सविस्तर जाहिरातीचे पाहावी. ऑनलाईन अर्ज https://mpsconline.gov.in या संकेतस्थळाद्वारे दिनांक १ ऑगस्ट, २०२५ ते २१ ऑगस्ट, २०२५ या
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५’ ची घोषणा केली आहे. या परीक्षेद्वारे महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमधील एकूण ९३८ रिक्त पदे भरली जातील. ही पूर्व परीक्षा रविवार, ४ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्रांवर आयोजित केली जाईल. ‘एमपीएससी’ने सोमवारी (०६ ऑक्टोबर) रोजी परिपत्रक काढून या भरतीची माहिती दिली. या भरतीसाठी मंगळवारी म्हणजेच ०७ ऑक्टोबर २०२५ पासून अर्जप्रक्रिया सुरू होणार आहे. चला तर या भरतीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात…
पदनिहाय रिक्त जागा आणि वेतनश्रेणी –
गट क परीक्षेद्वारे उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक आणि लिपिक-टंकलेखक यांसारख्या विविध पदांसाठी भरती केली जाईल. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातील उद्योग निरीक्षकासाठी ९ पदे असून याची वेतनश्रेणी एस-१३ (रु. ३५,४००-१,१२,४००) आहे. वित्त विभागातील तांत्रिक सहाय्यकासाठी ४ पदे असून याची वेतनश्रेणी एस-१० (रु. २९,२००-९२,३००) आहे. वित्त विभागातील कर सहाय्यकासाठी ७३ पदे असून याची वेतनश्रेणी एस-८ (रु. २५,५००-८१,१००) आहे. तर प्रशासकीय विभाग आणि विविध राज्य सरकारी कार्यालयांमधील लिपिक-टंकलेखकासाठी ८५२ पदे असून याची वेतनश्रेणी एस-६ (रु. १९,९००-६३,२००) आहे. एकूण ९३८ पदांची भरती केली जाईल.
अर्जाची प्रक्रिया
अर्ज प्रक्रिया एमपीएससीच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीद्वारे ऑनलाइन पद्धतीने केली जाईल. अर्ज ७ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २:०० वाजल्यापासून स्वीकारले जातील. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची आणि परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख २७ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये चलनद्वारे शुल्क भरणाऱ्यांसाठी, चलनची प्रत मिळवण्याची अंतिम तारीख २७ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे आणि बँकेत शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख ३० ऑक्टोबर २०२५ रोजी बँक कामकाजाच्या वेळेपर्यंत आहे.
दिव्यांग उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना –
भरती प्रक्रिया दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ आणि संबंधित शासकीय ठरावांचे पालन करते. अंधत्व/अल्पदृष्टी (B, LV), बहिरेपणा/श्रवणदोष (D, HH), आणि विविध शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक अपंगत्व यांसारख्या अपंगत्वाच्या विशिष्ट श्रेणींचा उल्लेख केला आहे. दिव्यांग आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांकडे किमान ४०% कायमस्वरूपी अपंगत्वाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. आरक्षणाचे फायदे मिळवण्यासाठी युनिक डिसेबिलिटी आयडी (UDID) कार्ड मिळवण्याची आणि प्रमाणित करण्याची प्रक्रिया तपशीलवार दिली आहे, जी अनिवार्य