Viral Dance Video: सोशल मीडियावर नवनवीन गाणी, डान्स व्हिडीओ अशा अनेक गोष्टी सतत व्हायरल होत असतात. या व्हायरल गाण्यांवर, डायलॉग किंवा डान्स स्टेप्सवर लोक मोठ्या प्रमाणात रील्स बनविताना दिसतात. या चर्चेत असलेल्या गोष्टींवर अनेक सेलिब्रिटीदेखील रील्स बनवतात. नुकत्याच काही दिवसांपूर्वी धुरंधर हा बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाला असून यातील अनेक सीन आणि गाणी सुपरहिट ठरत आहेत. या चित्रपटातील ‘FA9LA’ हे गाणं आणि या गाण्यातील अक्षय्य खन्नाच्या डान्सने अक्षरशः प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. सध्या याच गाण्यावरील एक डान्स खूप व्हायरल होतोय.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
स्वत:चं लग्न खास बनवण्यासाठी नवरा आणि नवरी डान्स करताना दिसतात. अशाच एका लग्नाच्या फंक्शनमध्ये नवरी मनापासून नाचताना दिसत आहे. पूर्वी लग्नसराई म्हटलं की शुभ मुहूर्त, मानपान, लग्नातील विधी याकडे अधिक लक्ष दिलं जायचं. परंतु, आताच्या लग्नांमध्ये लग्नातील वधू-वराच्या एन्ट्रीचे डान्स, भन्नाट उखाणे, फोटो, व्हिडीओ याकडे अधिक लक्ष दिलं जातं. सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असल्याने सोशल मीडियावरही लग्नातील अनेक हटके रील्स, व्हिडीओ आणि फोटो सतत व्हायरल होत असतात. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये लग्नातील अनेक गमतीजमती, अनोख्या प्रथा, हटके उखाणे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात एक नवरी हळदीत भन्नाट नाचली आहे