Ashok Kharat Viral Video Nashik Crime News: गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याप्रकरणी नाशिकमध्ये कॅप्टन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरातला (Ashok Kharat) नाशिक पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर अशोक खरातला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने अशोक खरातला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशोक खरातवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. (Ashok Kharat Nashik Crime News)
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
केल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडीओमध्ये काही नामांकित महिला व सेलिब्रिटी संबंधित असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. भविष्य जाणून घेण्यासाठी बडे बडे नेते, सेलिब्रिटी अशोक खरातच्या दरबारात हजेरी लावायचे. दरम्यान, अशोक खरातचा काल पहिला आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर आता अशोक खरातचे आणखी काही व्हिडीओ एबीपी माझाच्या हाती लागले आहेत. (Ashok Kharat Viral Video)
अशोक खरातचा दुसरा आक्षेपार्ह व्हिडीओ, नेमकं काय? (Ashok Kharat Viral Video)
अशोक खरात याचे अनेक कारणाने आता समोर येऊ लागलेत. पोलिसांकडे तक्रार करणारी एकमेव महिलाच नाही अशा अनेक महिलांवर त्यांने अत्याचार केले असल्याचं समोर येतंय.अशोक खरातचे अत्याचाराचे 58 व्हिडिओ पोलिसांना मिळाले आहेत. त्यातील काही व्हिडीओ एबीपी माझाच्या हाती लागलेत. यात महिलेवर अत्याचार करून तो स्वतःच्या पायावर पडायला देखील भाग पाडतोय. बाजूला एक खुर्ची देखील आहे. त्यावर पांढरा कपडा टाकलेला आहे. त्या खुर्चीच्या देखील पाया पडायला लावतो. पण प्रश्न हा आहे की एवढं करूनही त्या विरोधात यापूर्वी तक्रार का झाली नाही. अशोक खरात नेमकी कशाकशाची भीती दाखवत होता. या प्रश्नाचे उत्तर पोलिसांच्या तपासूननंतर समोर येतील.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नेमकं प्रकरण काय? (Nashik Ashok Kharat Case)
अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशोक खरात याने एका 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार (Rape news) केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बुधवार 18 मार्च रोजी खरात याला पहाटे तीन वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले. अशोक खरात हा सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून तो नावारुपाला आला. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जातात. मात्र, त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.