Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला तिच्या घरामध्ये “खेळताना रंग बाई होळीचा” या गाण्यावर भन्नाट लावणी करताना दिसतेय. महिलेच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होतोय.लावणी हा आपल्या महाराष्ट्रातील लोकप्रिय लोककलेचा प्रकार आहे. महाराष्ट्राची शान म्हणून लावणी नृत्य ओळखले जाते. त्यामध्ये संगीत, नृत्य व गीत यांचा मिलाफ साधलेला असतो. लावणी नृत्यामध्ये कलाकार पायांत घुंगरू बांधून, ढोलकीच्या तालावर ते सादर करतात. सोशल मीडियावर अनेक जण ही मराठी लोककला सादर करताना दिसतात. लावणीच्या विविध गाण्यांवर नृत्य करताना दिसतात. दरम्यान, आता एका महिलेचा सादर केलेल्या लावणीचा एक जबरदस्त व्हिडीओ व्हायरल होतोय
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा