Air India passenger aircraft crashes Live Updates: गुजरातहून लंडनसाठी रवाना झालेले एअर इंडियाचे विमान अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या विमानात २४२ प्रवासी होते, असे सांगितले जात आहे. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सांगितले जात आह
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते आणि अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच मेघानीनगरजवळ हा अपघात झाला. विमानतळापासून मेघानीनगरचे अंतर सुमारे 15 किलोमीटर आहे. अपघातानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्यास सुरुवात केली
प्राथमिक माहितीनुसार, जेव्हा या विमानाला अपघात झाला तेव्हा त्या विमानात क्रू मेंम्बर्ससह एकूण 242 प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
विमानतळापासून मेघनीनगरचे अंतर सुमारे 15 किमी आहे. अपघातानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आग विझवण्यास सुरुवात केली. विमान अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये अपघातस्थळावरून आकाशात धुराचे प्रचंड लोट पाहायला मिळत आहेत. या दुर्घटनेनंतर आपत्कालीन प्रतिसाद पथक घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी अद्याप अपघाताचे कारण निश्चित केलेले नाही. मेघनीनगर परिसरातील धारपूर येथून प्रचंड धूर दिसत आहे.
अपघातस्थळी BSF आणि एनडीआरएफच्या (NDRF) टीम रवाना करण्यात आल्या आहेत. अपघातग्रस्त विमान बोईंगचे ७८७ ड्रीमलायनर असल्याचे सांगितले जात आहे, जे ११ वर्षे जुने होते.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा