Animal Viral Videos : बिबट्या एका लहान मुलावर हल्ला करण्यासाठी घरात शिरला होता. पण पाहा प्रामाणिक कुत्र्यांमुळे त्याचा जीव कसा वाचला, व्हिडीओ पाहून व्हाल दंग
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
बिबट्या हा किती खतरनाक शिकारी आहे, हे काही वेगळं सांगायला नको. गर्द झाडी असो वा गडद अंधार, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही बिबट्या शिकार करण्याची क्षमता ठेवतो. अहो, वेळ आली तर तो लोकांच्या घरात शिरून गाई-गुरांवर हल्ले करतो. असे कितीतरी Leopard Attack Viral Video तुम्ही इंटरनेटवर पाहू शकता. याच यादीत आता आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. एक लहान मुलगा अंगणात खेळत असताना अचानक बिबट्या धावत अंगावर आला. पुढे या मुलाचं काय झालं, हे आता तुम्हीच पाहा. हा थरारक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
नेमकं घडलं तरी काय?
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक मुलगा घराच्या अंगणामध्ये खेळत आहे. तितक्यात पाळीव कुत्रे धावत घरात शिरतात. सुरुवातीला मुलाला काहीच कळत नाही. मात्र तेवढ्यात पाठीमागून एका बिबट्याची एन्ट्री होते. हा बिबट्या हल्ला करण्याच्या इराद्याने धावत अंगणात आला. पण सुदैवाने तो फारसा पुढे आला नाही. कुत्र्यांचा रौद्र अवतार पाहून अचानक त्याने यूटर्न मारला. बहुधा हल्ला करण्यासाठी ही योग्य वेळ नाही ही गोष्ट त्याच्या डोक्यात आली असावी. पण नशीब बलवत्तर होतं, म्हणून मुलाचे प्राण वाचले. अन्यथा हाताच्या अंतरावर असलेला बिबट्याने त्याला उचलून नेलं असतं.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
हा व्हिडीओ होतोय व्हायरल
लाख ४४ हजारांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून, अनेकांनी पाळीव कुत्र्यांचं कौतुक केलं आहे. कारण ते कुत्रे जर बिबट्यावर धावून गेले नसते, तर त्याने मुलावर हल्ला केलाच असता. असो, हा व्हिडीओ पाहून तुमच्या डोक्यात कुठला विचार आला? तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया द्या.
https://x.com/gharkekalesh/status/1919649052922192375