Ashok Kharat Case Nashik Crime News: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat)याच्याशी संबंधित आतापर्यंत दाखल सर्व 10 गुन्ह्याचा तपास एसआयटीच्या माध्यमातून केला जाणार आहे. अशोक खरात याच्यावर नाशिक पोलिसांत 8 गुन्हे दाखल झाले आहेत. तर वावी पोलिसात अशोक खरात याने दिनेश परब आणि राजेंद्र जासूद विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. शिर्डी पोलिसांत अशोक खरातच्या ऑफिस बॉय विरोधात गुन्हा दाखल आहे, हे सर्व गुन्हे एकमेकांशी संलग्न असल्यानं सर्व गुन्ह्याचा एकत्रित तपास एसआयटीच्या माध्यमातून केला जाईल. एसआयटीच्या टीमने काल रात्री नाशिक क्राईम ब्राँचकडून डीव्हीआर, सीसीटीव्ही, लॅपटॉप, कागदपत्रे यासह सर्व मुद्देलमाल ताब्यात घेतला असून या सर्व प्रकरणाचा एकत्रित तपास आता केला जाणार आहे. याचदरम्यान, अशोक खरातबाबत विविध धक्कादायक माहिती समोर येत आहे. (Ashok Kharat Case l
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
अशोक खरातने 150 हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. जोडप्यांना समोर बसवून पत्नीमुळेच यशस्वी झाल्याचे पतीला सांगून तो महिलेच्या मनात सहानुभूती तयार करायचा. तसेच अशोक खरात हा मोठे अधिकारी, उद्योगपतींसोबत मुलींचे संबंध जुळवून द्यायचा. त्यासाठी तो अंकशास्त्राचा आधार घेत असल्याचे भासवायचा, असंही समोर आलं आहे. ज्या केबिनमध्ये तो महिलांचे लैंगिक शोषण करायचा, त्या केबिनच्या बाहेर असलेल्या झुंबरचा लाइट आतून बंद करीत असे. या झुंबरातील लाइट बंद तोपर्यंत चेंबरमध्ये कोणालाही प्रवेश द्यायचा नाही, हा त्याचा अर्थ असे. त्याच्या कार्यालयात काम करणाऱ्यांना ही सांकेतिक भाषा माहिती होती, असंही चौकशीत समोर आलं आहे. (Ashok Kharat Viral Video) आहे. त्यापैकी 5 काडतुसे वापरलेली, वापर कशासाठी केला याचा तपास सुरू आहे. राज्यभर गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत आहे.