Baby Play King Cobra Viral Video : चिमुकला सापाबरोबर नुसतं खेळत नाही तर कधी सापाला पटापट चापट लगावतोय तर कधी फणा पकडून चावण्याचा प्रयत्न करतो.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ठेवून राहतात. काही साप तर इतके विषारी असतात की, त्यांच्या एका दंशाने क्षणात माणसाचा मृत्यू होतो. पण, काही जण सापाबरोबर खेळणं असल्याप्रमाणे खेळताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुमच्या काळजात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही; कारण ज्या सापाला पाहून व्यक्ती १०० पावलं दूर पळून जातो, त्या सापाच्या पुढ्यात बसून एक चिमुकला खेळतोय.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
नुसतं खेळत नाही तर कधी सापाला पटापट चापट लगावतोय तर कधी त्याचा फणा पकडून असं काही करतो की पाहताना आपल्याला भीती वाटेल. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.व्हिडीओत चिमुकला घराच्या अंगणात आरामात बसला आहे. त्याच्यासमोर एक साप फणा पसरवून उभा आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो खऱ्याखुऱ्या सापाशी अगदी रबरी साप असल्याप्रमाणे खेळतोय. कधी त्याला चापट मारतो, फणा पकडून गदागदा हलवतो,
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
वाचाभारतावरील हल्ल्याचे पुरावे मागितल्याने पाकिस्तानी महिलेला मारहाण? VIRAL VIDEO तील दावा खरा की खोटा, वाचाव्हिडीओत स्पष्टपणे दिसतेय की, सापाचा आकार चिमुकल्यापेक्षा जवळपास तिप्पट आहे.
यावेळी साप फणा पसरवून शांतपणे चिमुकल्यासमोर बसलेला असतो, पण चिमुकला त्याच्या फण्यावर, कधी अंगावर एकामागून एक चापट मारू लागतो. इतकेच नाही तर त्याचा फणा हाताने पकडण्याचाही प्रयत्न करतो. यानंतर साप मागे हटून पुन्हा त्याच्या हाताजवळ फणा घेऊन येतो, यावेळी चिमुकला फणा दोन्ही हाताने पकडतो आणि चक्क त्याला तोंडाने चावण्याचा प्रयत्न करतो
आणि हसतो. पण, साप पटकन त्याच्या हातातून खाली निसटतो, पण एवढा त्रास देऊनही साप चिमुकल्याला काहीच इजा करत नाही. व्हिडीओतील हे दृष्य पाहून अनेक जण हैराण झाले आहेत. लोक वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. काही जण याला चमत्कार म्हणत आहेत, तर काही जण प्राण्याच्या निरागसतेचे आणि संयमाचे कौतुक करत आहेत.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा