Bangalore College Professor Dance Viral Video : मराठमोळी संस्कृती म्हटली की, सगळ्यात आधी लावणीच आठवते. लावणी सादर केल्यानंतर समोरचा प्रेक्षक अगदी उत्साहाने नाचू, गाऊ लागतो. त्यामुळे अनेक मराठी चित्रपटात लावणी आजही आवर्जून ठेवली जाते; जेणेकरून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले जाईल.पण, लावणीची ही क्रेझ आता महाराष्ट्रापूर्ती मर्यादित राहिली नाही बंगळुरू पर्यंत पोहचली आहे. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये कॉलेजच्या प्रोफेसरने जबरदस्त डान्स केलेला दिसतो आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
अनेक महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यादरम्यान विद्यार्थी नाटक, डान्स सादर करतात. पण, याचबरोबर कधीकधी ते शिक्षकांनाही डान्स करण्यास सांगतात. मग शिक्षकांचे कधीही न पाहिलेले टॅलेंट पाहून सगळेच थक्क होऊन जातात. बंगळुरूच्या एका महाविद्यालयात काहीतरी असेच घडले आहे. बंगळुरूच्या प्राध्यापकाने महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात नटरंग सिनेमातील ‘वाजले की बारा’ या गाण्यावर भन्नाट डान्स करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
ज्योती निवास कॉलेज ऑटोनॉममध्ये हा कार्यक्रम कॉलेजच्या वार्षिक आंतरवर्गीय सांस्कृतिक महोत्सव ‘रॅप्सोडी २०२५’ दरम्यान पार पडला. डान्स करणाऱ्या सहाय्यक प्राध्यापकाचे नाव मंदारा गौडा असे आहे. गाण्यावर गुलाबी साडी नेसून मंदारा यांनी ‘वाजले की बारा’ या गाण्यावर डान्स केला आहे. गाण्याच्या प्रत्येक ओळीवर ताल, ठेका चुकला नाही किंवा स्टेप्स आणि हावभाव सुद्धा कुठेही कमी पडले नाही असा डान्स या प्राध्यापकाने केलेला दिसतो आहे. बंगळुरू प्राध्यापकाचा मराठी गाण्यावर डान्स एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…
अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘आमची शिक्षिका डान्सर सुद्धा आहे’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. नेटकरी डान्स पाहून ‘तुमचे हावभाव खूप मस्त आहेत’, ‘शिक्षिका बेस्ट असतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय’, ‘त्यांनी ज्याप्रकारे साडी नेसली आहे आणि सांभाळली आहे तेच डान्सबद्दल सगळं काही सांगून जात आहे’, ‘मॅडम तुम्ही जिल्हा परिषद मधल्या दिसता’ ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा