- Black Cobra Viral Video: साप म्हटलं की, अनेकांच्या अंगावर शहारे येतात. सापाच्या फुत्कार टाकणाऱ्या फुसफुस अशा आवाजानंही जीव घाबरतो. त्यातून जर समोर एखादा काळा नाग आला, तर मग विचारायलाच नको. अशाच एका थरकाप उडवणाऱ्या दृश्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, जो जंगलाच्या खूप आत गेलेल्या भागातून घेतला गेला असावा, असं वाटतं आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
जंगलाच्या खोल गाभ्यात एका क्षणात घडलेली ही घटना तुमचा श्वास रोखून धरते. एका छोट्या शांत बसलेल्या सापावर अनपेक्षितपणे मृत्यूचा घाला पडतो. एक काळा नाग अचानकपणे त्याच्यावर झडप घालतो आणि… पुढचं दृश्य थरकाप उडवणारं. डोळ्यांच्या पापण्या हलण्याच्या आत त्या नागाने सापाला गिळंकृत केलं आणि हा सर्व प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला.
या Video मध्ये जे घडतं, ते पाहून तुमचाही श्वास काही क्षण थांबेल. पानगळती झालेल्या झाडाखाली एका कोपऱ्यात शांत बसलेला एक साप अचानक हालचाल करतो… आणि त्या निमिषार्धात कुठून तरी एक काळा नाग झपाट्यानं समोर येतो आणि त्या छोट्या सापावर तुटून पडतो. काही क्षणांतच तो त्याला गिळून टाकतो. हो, हे खरं आहे की, एका नागानं दुसऱ्या सापाला गिळलं.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
https://x.com/AMAZlNGNATURE/status/1945204518288765025