दहावी बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर येथे पहा

 

 

 

Board Exam Date 2026 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. २०२६ मध्ये होणाऱ्या या परीक्षांमध्ये सुमारे ४५ लाख विद्यार्थी सहभागी होणार आहेत. दहावीची दुसरी परीक्षा १५ मे पासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना गुण सुधारण्याची संधी मिळणार आहे. वेळापत्रक सीबीएसईने जाहीर केले आहे. अधिक माहितीसाठी सीबीएसईच्या संकेतस्थळाला भेट द्या

 

 दहावी आणि बारावी वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

सीबीएसईने दहावीतील विद्यार्थ्यांना आपले गुण सुधारण्यासाठी आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता सीबीएसईची दहावीची परीक्षा २०२६ पासून वर्षातून दोन वेळा होईल, असे सांगण्यात आले होते. आता या दुसऱ्या परीक्षेसह दहावीच्या पहिल्या आणि बारावीच्या परीक्षेच्या तात्पुरत्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

 

 दहावी आणि बारावी वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

या तात्पुरत्या वेळापत्रकानुसार दहावी आणि बारावीची परीक्षा १७ फेब्रुवारी रोजी सुरू होईल. १७ फेब्रुवारीला दहावीची परीक्षा गणित या विषयाने सुरू होणार असून बारावीसाठी बायोटेक्नॉलॉजी, आंत्रप्रेन्युअरशिप, शॉर्टहँड या तीन विषयांचे पेपर सुरुवातीला होतील. दहावीची नियमित परीक्षा ९ मार्च रोजी संपणार असून बारावीची परीक्षा ९ एप्रिलपर्यंत चालणार आहे. या परीक्षेतील एखादा पेपर झाल्यानंतर १० दिवसांनी त्याच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम सुरू होणार असून त्यापुढील १२ दिवसांत ते पूर्ण केले

जाणार आहे.

 

Leave a Comment

error: Content is protected !!