Bus accident रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यातील काही अपघात चालकाच्या चुकीमुळे तर काही इतरांच्या चुकीमुळे घडतात. असाच एक शिवशाही बसच्या अपघाताचा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
गाडी चालवताना किती सतर्क राहावे लागते, हे या व्हिडीओमधून स्पष्ट होते. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्याही काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडीओमध्ये एका शिवशाही बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती रस्ता सोडून अचानक दुसऱ्या रस्त्यावर वळते. त्यानंतर पुढच्याच क्षणी ती एका डोंगराला जाऊन जोरात धडकते. हा अपघात इतका भीषण आहे की तो पाहतानाही भीती वाटते.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हायवेवर रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहतूक सुरू आहे. यावेळी एक शिवशाही बस भरधाव वेगात धावत आहे. अचानक बस रस्त्यावरून वळण घेते, थेट दुभाजक तोडून दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावर वळते आणि त्यानंतर थेट जाऊन डोंगराला आदळते. यात बसच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या अपघाताची थरारक दृश्ये मागून येणाऱ्या वाहनातील व्यक्तीने अतिशय अचूकपणे चित्रित केली आहेत. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर लोकांकडूनही अनेक कमेंट येत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘जर एखादी बस सहजपणे रेलिंग तोडून दुसऱ्या बाजूला जाऊ शकते, तर या रेलिंगचा उद्देश काय?’ दुसऱ्या एकाने लिहिले की, ‘ड्रायव्हरला एकतर झोप लागली किंवा त्याला स्ट्रोक आला असेल किंवा कदाचित त्याचा टायर फुटला असेल. आशा आहे की सर्वजण सुरक्षित असतील.’ शेवटी एकाने लिहिले की, “मला वाटतं तो ड्रायव्हर नशेत होता.”
https://x.com/Deadlykalesh/status/1927984357194576318