प्री- वेडिंगचा जीवघेणा थरार! लोणावळ्यातील खोल दरीत बांधलेल्या स्पेस नेटवर बसले अन्…; VIDEO पाहून काळजात भरेल धडकी.Couple Pre Wedding Shoot Viral Video

 

 

 

ouple Pre Wedding Shoot Viral Video : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर आणि तितकाच महत्वाचा क्षण असतो. यात गेल्या काही वर्षांपासून प्री-वेडिंग शूटचा एक वेगळा ट्रेंड पाहायला मिळतोय. अनेक कपल आपलं प्री- वेडिंग शूट इतऱ्यांपेक्षा हटके व्हावं यासाठी काहीतरी भन्नाट कल्पना शोधून काढतात. पण अनेकदा प्री-वेडिंग शूटच्या या भन्नाट कल्पनाच कपलच्या जीवावर बेतत असल्याच्या घटना घडत असल्याचे पाहायला मिळतेय. आत्तापर्यंत डोंगर- दरी, किल्ले, नदी- समुद्र किनारी किंवा गार्डन- पार्कमधील प्री-वेडिंग शूटचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील, पण एका कपलने चक्क ५०० ते ६०० फूट खोल दरी स्पेस नेटवर बसून प्री- वेडिंग शूट केलयं. इथे जरीशीही चूक झाली असती तर दोघांचाही मृत्यू निश्चित होता, पण तरीही जीव धोक्यात घालून कपलने हे प्री-वेडिंग शूट पूर्ण केलयं. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांना खूप ट्रोल केलं जातयं.

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

दोन बाजूला डोंगराचे सुळके त्यामध्ये ५०० ते ६०० फूट खोल दरी, या दरीवर स्पेस नेट बांधून त्यावर कपलचं प्री-वेडिंग शूट करण्यात आलं. त्यामुळे अनेकांनी आता प्री- वेडिंग शूट कोणत्या थराला जाऊन पोहोचयं? असा प्रश्न उपस्थित केला आहे. कारण प्री-वेडिंगचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही काळजात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.

 

रॉक क्यायंबर, स्लॅक क्लायनर ओंकार पडवळ यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा प्री-वेडिंग व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जो लोणावळ्यातील ड्यूक नोस या ठिकाणच्या खोल दरीत शूट करण्यात आला आहे, दोन डोंगराच्या मधील ५०० ते ६०० फूट खोल दरीत स्पेस नेट लावली आहे. ज्यावर बसून आणि उभं राहून विविध पोज देत कपलने अॅडव्हेंचर प्री- वेडिंग शूट केलयं.

 

 

 

 

व्हिडीओच्या सुरुवातीला ओंकार पडवळ सांगतोय की, आज आपण स्पेस नेटवर फोटोशूट करतोय. मी मागच्या ८ वर्षांपासून अॅडव्हेंचर स्पोर्ट्स करतोय, आता मी लग्न करतोय, माझी होणारी पत्नी या फिल्डमधील नाही, तिला मी या स्पोर्ट्सची ओळख करुन देतोय…. यानंतर बॅकग्राउंडला टिक टिक वाजते डोक्यात गाणं वाजतं आणि चित्त थरारक साहसी व्हिडीओ समोर येतो. यात नेटवर ओंकारची पार्टनर बसलेली दिसतेय, तर ओंकार रश्शीवर चालत साहसी खेळ करत तिच्याजवळ पोहोचताना दिसतोय.

 

दरम्यान या प्री- वेडिंग व्हिडीओवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहीजण या कपलचं कौतुक करत आहेत, तर काहींनी त्यांच्या धाडसाला सलाम केलयं, एका युजरने लिहिले की, ताई यायला तयार झाल्या यातचं प्रेम दिसून येतं. दुसऱ्याने लिहिले की, तुमच्या हिंमतीला दाद दिली पाहिजे. तर तिसऱ्या एकाने म्हटले की, पार्टनरला स्पोर्ट्सची ओळख करुन देण्याचा हा पॅर्टन जरा वेगळाच आहे.

 

त्याचबरोबर काहींनी या प्री- वेडिंग शूटवरुन कपलला चांगलचं ट्रोल देखील केलयं. एकाने लिहिले की, प्री- वेडिंग नव्हे ही ##गिरी आहे. दुसऱ्या एकाने लिहिले की, Pre wedding राहायचं बाजूला अन् दोघांचं तेरावा करायला यायला लागायचं. तिसऱ्या एकाने सवाल केला की, हेल्मेट नाही घातले, शूज नाही घातले, कोणी तुमचे बघून केले तर?.

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!