सरकारी कर्मचाऱ्यांचा आनंद गगनात मावेना; पगारात ३४% पर्यंत वाढ होणार? 8 वा वेतन आयोग आणणार खुशखबर
राज्य कर्मचाऱ्यांना इतकी पगार वाढ होणार? आठवा वेतन आयोगानुसार नवा अपेक्षित पे स्केल जाणून घ्या!
भारत सरकारच्या कर्मचाऱ्यांसह पेंशनधारकांना 8व्या वेतन आयोगाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. या आयोगामुळे वेतनात वाढ, नवीन वेतन श्रेणी आणि सुधारित वेतन स्ट्रक्चर लागू होण्याची शक्यता आहे. फिटमेंट फॅक्टर आणि किमान वेतनवाढीबाबत चर्चा सध्या जोरात सुरू आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
8वा वेतन आयोग वेतन कॅल्क्युलेटर: लेवल-6 (GP-4200), बेसिक पगार ₹35,400 वरून किती होणार पगार? जाणून घ्या सविस्तर हिशोब
8वा वेतन आयोग कधी लागू होणार?
सध्याचा 7वा वेतन आयोग डिसेंबर 2025 मध्ये संपत आहे. त्यामुळे 8वा वेतन आयोग जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे. अद्याप सरकारने यासंदर्भात अधिकृत घोषणा केलेली नाही, मात्र अंदाजानुसार ही अंमलबजावणी 2026 पासूनच होणार आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
पेंशनमध्ये किती वाढ होणार?
8व्या वेतन आयोगामुळे पेंशनधारकांच्या पेंशनमध्ये सुमारे 30% ते 34% इतकी वाढ होऊ शकते, अशी माहिती एका ब्रोकरेज फर्मने दिली आहे. या फर्मच्या अहवालानुसार, देशात सध्या सुमारे 68 लाख पेन्शनधारक आहेत, जे कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांच्या संख्येपेक्षा अधिक आहेत.
कोणत्या गोष्टींचा पेंशनवर परिणाम होतो?
पेंशन ठरवताना मूळ वेतन आणि महागाई भत्ता (DA) विचारात घेतला जातो. मात्र, हाउस रेंट अलाऊन्स (HRA) आणि ट्रॅव्हल अलाऊन्स (TA) यांचा यात समावेश होत नाही. 8वा वेतन आयोग लागू झाल्यावर नवीन फिटमेंट फॅक्टरनुसार मूळ वेतनात वाढ होईल आणि महागाई भत्ता पुन्हा 0 टक्क्यांपासून सुरू होईल.
राज्य कर्मचाऱ्यांना इतकी पगार वाढ होणार? आठवा वेतन आयोगानुसार नवा अपेक्षित पे स्केल जाणून घ्या!
सरकारवर किती आर्थिक भार पडेल?
या आयोगामुळे केंद्र सरकारवर सुमारे ₹1.8 लाख कोटींचा अतिरिक्त खर्च होणार आहे. यापूर्वी 7व्या वेतन आयोगामुळेही सरकारच्या पेन्शन संबंधित खर्चात मोठी वाढ झाली होती.
8वा वेतन आयोग म्हणजे काय?
8वा वेतन आयोग हा केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे सध्याचे वेतन आणि पेंशन संरचना यावर पुनर्विचार करून सुधारणा सुचवणारा आयोग आहे. याअंतर्गत नवीन वेतनसंच तयार केला जाईल आणि त्यानुसार वेतन व पेंशनमध्ये वाढ केली जाईल.
8वा वेतन आयोग लागू झाल्यावर सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक दोघांनाही मोठा आर्थिक फायदा होणार आहे. विशेषतः 30% पेक्षा अधिक पेंशन वाढण्याची शक्यता असल्याने लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ही खूपच दिलासादायक बातमी आहे.