Gold and Silver Price Hike: भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींनी सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. गेल्या अवघ्या सात दिवसांत चांदीच्या दरात तब्बल 35000 रुपयांची प्रचंड वाढ झाली आहे. केवळ चांदीच नाही तर सोन्याच्या दरात सुद्धा मोठी वाढ ढाली आहे.
सोन्याचे दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Gold Silver Rate: जागतिक बाजारपेठेतील घडामोडींमुळे भारतीय सराफा बाजारात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. गेल्या सात दिवसांत सोन्या-चांदीच्या किमतींनी असा काही वेग घेतला आहे की, सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. विशेषतः चांदीच्या दरात झालेली एका आठवड्यातील वाढ ही आजवरच्या इतिहासातील सर्वात
चांदीची सुसाट धाव
गेल्या अवघ्या एका आठवड्यात चांदीच्या किमतीत तब्बल 35000 रुपये प्रति किलोची प्रचंड वाढ झाली आहे. 18 जानेवारी 2026 च्या सकाळी देशांतर्गत बाजारात चांदीचा भाव 2,95,000 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. 2026 या वर्षाच्या सुरुवातीपासूनचा विचार केला, तर चांदीने आतापर्यंत सुमारे 22.4 टक्क्यांचा परतावा दिला आहे. चांदीच्या वाढत्या औद्योगिक मागणीमुळे ही तेजी अधिक गडद होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
सोन्याचा दरही विक्रमी उच्चांकावर
चांदीपाठोपाठ सोन्यानेही ग्राहकांना घाम फोडला आहे. गेल्या आठवडाभरात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 3320 रुपयांची वाढ झाली आहे. दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,43,930 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या सोन्याचा भाव 1,31,950 रुपये इतका आहे. मुंबई, पुणे आणि कोल्हापूर सारख्या प्रमुख शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर 1,43,780 रुपयांच्या आसपास असून, 22 कॅरेटसाठी ग्राहकांना 1,31,800 रुपये मोजावे लागत आहेत.
सोन्याचे दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
दरवाढीचे मुख्य कारण काय?
आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेतील महागाईचे आकड अपेक्षेपेक्षा कमी आले आहेत. यामुळे अमेरिकन मध्यवर्ती बँक ‘फेडरल रिझर्व्ह’ लवकरच व्याजदरात कपात करेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. जेव्हा बँकांचे व्याजदर कमी होण्याची शक्यता असते, तेव्हा जगभरातील गुंतवणुकदार शेअर्स किंवा इतर पर्यायांऐवजी सोने-चांदीसारख्या सुरक्षित गुंतवणुकीकडे वळतात. याच जागतिक मागणीमुळे स्थानिक बाजारात किमती भडकल्या आहेत.
लग्नसराईत ग्राहकांची चिंता वाढली
महाराष्ट्रात सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असल्याने सोने खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. मात्र, सोन्याचे दर दीड लाखाच्या घरात पोहोचल्याने मध्यमवर्गीयांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. दुसरीकडे, ज्यांनी आधीच सोने-चांदीत गुंतवणूक करून ठेवली आहे, त्यांच्यासाठी मात्र ही दरवाढ फायदेशीर ठरली आहे.