पुढील काही दिवसात सोन्याचा दर कसा राहील?, याबाबत वर्ल्ड गोल्ड कौन्सिल (WGC) ने त्यांच्या रिपोर्टमधून मत व्यक्त केले आहे. सध्याच्या बाजारातील मत लक्षात घेता या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत सोन्याचा दर एका मर्यादेत वाढण्याची शक्यता आहे. जो सध्याच्या दराच्या पातळीपेक्षा ०-५ टक्क्यांनी जास्त राहील, असे डब्ल्यूजीसीने रिपोर्टमध्ये म्हटले आहे. सध्याच्या स्तरावरुन सोन्याच्या दरात ०-५ टक्के वाढ झाल्यास सोन्याच्या दरात वार्षिक २५ ते ३० टक्के वाढ होऊ शकते.
“या संमिश्र स्वरुपाच्या आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, मध्यवर्ती बँका चौथ्या तिमाहीच्या अखेरीस सावध भूमिका घेत व्याजदर कमी करण्यास सुरुवात करतील असे अपेक्षित आहे. तर अमेरिकेची फेडरल रिझर्व्हकडून वर्षाच्या अखेरीस व्याजदरात ५० बेसिस पॉइंट्सची कपात करण्याची शक्यता आहे,” असे WGC ने म्हटले आहे.
२०२५ च्या पहिल्या सहामाहीत सोन्याच्या दरात सुमारे २६ टक्क्यांनी वाढ झाली. कमकुवत अमेरिकन डॉलर, एका मर्यादेत राहिलेला व्याजदर, भू-राजकीय तणाव ही सोने दरवाढीमागील कारणे आहेत. दरम्यान, २०२५ मध्ये आतापर्यंत सोन्याने गुंतवणूकदारांना २९ टक्के परतावा मिळवून दिला आहे.
रुपये, १८ कॅरेट ७३,०२८ रुपये आणि १४ कॅरेटचा दर ५६,९६२ रुपयांवर खुला झाला.
दुचाकीच्या चाकात अडकल्याने महिलेचा मृत्यू
दहीगाव येथील शेतकरी विनायक अवताडे हे शेतात गेले होते. शेतातून घरी परत येत असताना अचानक तेल्हारा परिसरात दुपारदरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस झाला व दहीगाव नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आला. या पुरामध्ये ते वाहून गेले . घरी न परतल्याने त्यांची शोधाशोध केली याबाबत रात्रीच महसूल विभागाला माहिती देण्यात आली होती. त्यामुळे सकाळी मंडळ अधिकारी, तलाठी, पोलिस पाटील, सरपंच, आपत्कालीन पथक गावात पोहचले होते. शोध घेत असताना गावापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर नाल्यामध्ये शेतकरी विनायक अवताडे यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी पोलिस व महसूल विभागाने पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला. त्यांच्यावर गुरुवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.