Hotel Tiranga: धाराशिव जिल्ह्यातील हॉटेल भाग्यश्रीची सध्या राज्यभरात जोरदार चर्चा आहे. २५० रुपयांमध्ये अनलिमिटेड मटण थाळी मिळत असल्याने हॉटेवर गर्दी असते. विशेष म्हणजे क्वालिटी आणि क्वांटिटीच्या बाबतही हॉटेल मागे नाही, असं मालक वारंवार सांगत असतं. महत्त्वाचं म्हणजे दररोज दहा-बारा-वीस अशी बोकडं कापली जातात, त्यामुळे हे हॉटेल आणि हॉटेल मालक प्रसिद्धीच्या झोतात आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
नुकतंच हॉटेल मालकाने फॉर्च्युनर गाडी घेतल्याने त्याचीही सोशल मीडियात जोरदार चर्चा झाली. त्यानंतर हॉटेलमध्ये आणखीनच गर्दी वाढली आहे. मात्र हॉटेलमालक नेहमीच सुट्ट्या घेत असल्याने त्याला ट्रोल केलं जातंय. वेगवेगळी कारणं सांगून हॉटेल बंद ठेवल्याने त्याच्या मीम व्हायरल झाल्या आहेत.
हॉटेलवर दगडफेक
हॉटेल भाग्यश्रीवर दगडफेक झाल्याची घटना रविवारी घडली आहे. रविवारी हॉटेल बंद होतं. त्यानंतर सोमवारी हॉटेल मालकाने याबाबत इन्स्टाग्रामवरुन माहिती दिली. व्हिडीओमध्ये मालक सांगतात की, हॉटेल भाग्यश्री.. आज ९ तारीख आहे. काल बंद होतं. आज उघडणार होतो, परंतु रात्री दगडं मारुन नुकसान केलं आहे. बोर्डचं नुकसान केलं आहे. सगळ्यंनी नोंद करावी, धन्यवाद.. हॉटेल भाग्यश्री नाद करतो काय.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
दुसऱ्या व्हिडीओमध्ये मालकाने सांगितलं की, कामगाराचे वडील वारले त्यामुळे अंत्यविधीला गेलो होतो, त्यामुळे हॉटेल बंद होतं. परंतु काही जळणारे माणसं, काही विरोधक.. जे जास्त जळतात ते, त्यांनी काल येऊ दगडं मारुन नुकसान केलं. तुमच्या xxमध्ये दम नाही.. बरोबरीत येऊन धंदा करुन दाखवावा.. मी साठ कापतो (बोकडं) तुम्ही सातच कापून दाखवा, चार-पाच माणसं पाठवून खोड्या करणं बंद करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
हॉटेल तिरंगाच्या मालकाचा फुल सपोर्ट
”हॉटेल व्यवसाय उभं करणं खूप मोठी गोष्ट आहे. धाराशिव जिल्ह्याचं नाव आम्ही मोठं करतोय. भाग्यश्रीच्या मालकाला विनंती आहे की, खचून जाऊ नका. जिल्ह्याचं नाव आपण दोघेजण मोठं करु. भांडायचं तर समोरासमोर जाऊन भांडा, असल्या खोड्या करु नका.” असं आवाहन हॉटेल तिरंगाच्या मालकाने अज्ञान हल्लेखोरांना केलं आहे.