बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा किती दिवस, हवामान तज्ञ काय सांगतात ?
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा किती दिवस, हवामान तज्ञ काय सांगतात बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील 4 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अलर्ट हवामान खात्याने जारी केलाय.बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाचा जोर ३० तारखेपर्यंत कायम राहील, असे IMD कडून सांगण्यात आले आहे. काही भागांत मेघगर्जनेसह व वादळी वाऱ्यासह ताशी ३० ते ४० किमी प्रतितास वारे वाहतील, असा अंदाज आहे. या कालावधीत विजा चमकण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे
राज्यात आज पुढील काही तासात मुसळधार ते अतीमुसळधार तर काही ठिकाणी अतीव्रुष्टीचा अंदाज हवामान खात्याने जारी केलाय..मराठवाडा, विदर्भातील काही जिल्हे तसेच कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अतीमुसळधारेचा आँरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे..