महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलं आहे, सध्या राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. दरम्यान आज देखील राज्यातील अनेक भागांमध्ये भारतीय हवामान विभागाकडून (IMD) अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलं आहे, सध्या राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. दरम्यान आज देखील राज्यातील अनेक भागांमध्ये भारतीय हवामान विभागाकडून (IMD) अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
नागपूरसह विदर्भाला पावसानं झोडपून काढलं आहे, विदर्भात पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे, दरम्यान नागपूरचे जिल्हाधिकारी विपीन ईटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर जिल्ह्यात आजही हवामान विभागाकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे जास्त पाऊस झाल्यास लष्कराची मदत घेणार असल्याचं ईटकर यांनी म्हटलं आहे. एसडीआरएफ, एनडीआरएफच्या टीम सज्ज आहेत, लष्कराचे जवानंही अलर्ट मोडवर आहेत. आतापर्यंत 40 लोकांना रेस्क्यू करण्यात आलं आहे. दरम्यान आज देखील नागपुरात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आल्यानं शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत, लोकांनी आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी माहिती जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर पूर्व विदर्भात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
कोकणात पावसाचा हाय अलर्ट
हवामान विभागाकडून कोकणात पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये देखील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणातील काही भागांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, समुद्र किनारी फिरू नका, असं आवाहानही हवामान विभागाकडून नागरिकांना करण्यात आलं आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
मध्य महाराष्ट्रातही पावसाचा इशारा
मध्य महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगलीसह, कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाड्यात देखील आज मुसळधार पावसाची शक्यता आहे, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा