उंच झाडावर फणा काढून बसला होता भलामोठा किंग कोब्रा, इतक्यात…; VIDEO पाहून तुम्हालाही फुटेल घाम

 

 

 

 

 

King Cobra Viral Video : जगभरात सापांच्या अनेक प्रजाती आढळतात. त्यातील किंग कोब्रा ही प्रजात विषारी आणि महाकाय शरीरासाठी ओळखली जाते. या सापाच्या एका दंशाने काही मिनिटांत माणसाचा मृत्यू होऊ शकतो. म्हणून केवळ माणूसच नाही, तर अनेक प्राणीदेखील किंग कोब्रापासून अंतर ठेवून राहतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका महाकाय किंग कोब्राचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. त्यातून भले भले घाबरतील अशी किंग कोब्राची लांबी दिसतेय.

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

 

 

व्हायरल व्हिडीओमध्ये एक महाकाय किंग कोब्रा एका झाडाच्या सर्वांत उंच फांदीवर चढताना दिसत आहे. झाडावर चढताच तो फणा पसरवून डुलताना दिसतोय. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसतेय की, किंग कोब्रा एका दाट हिरव्यागार झाडाच्या एका उंच फांदीवर अतिशय शांतपणे धोकादायक स्थितीत बसला आहे. त्याची लांबी आणि त्याच्या फण्याचा आकार पाहून कोणालाही भीती वाटेल. सहसा साप जमिनीवर सरपटताना दिसतो. पण हा किंग कोब्रा ज्या पद्धतीने एका उंच झाडावर पोहोचला आहे, ते फार असामान्य आणि आश्चर्यकारक आहे. हे दृश्य पाहतानाही फारच भयावह वाटते.

 

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

 प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय की, झाडाच्या वर इतका मोठा साप कधीच पाहिला नाही. भयानक आणि आश्चर्यकारक. दुसऱ्याने कमेंट केली की, हे दृश्य नॅशनल जिओग्राफिकमध्येही क्वचितच दिसते.

 

 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!