राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे २० लाख महिलांचे अनुदान ई-केवायसी पडताळणीसाठी थांबविण्यात आले आहे. ज्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील सुमारे एक लाखांवर महिलांचा समावेश आहे. संबंधित सर्व महिलांची ई-केवायसी पडताळणी पूर्ण करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर टाकण्यात आली आहे. मात्र, ही पडताळणीची प्रक्रिया नावालाच सुरू असून, संबंधित सर्व महिलांचे पैसे कायमस्वरूपी थांबविण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
e-KYC ई-केवायसी झाली का तात्काळ पहा लाडक्या बहिणींची यादी जाहीर यादीत नाव पहा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्यातील महिलांसाठी मोठा आधार ठरली असून, त्या माध्यमातून दरमहा १,५०० रुपयांची थेट आर्थिक मदत दिली जात आहे. मात्र, या योजनेच्या अंमलबजावणीतील काही तांत्रिक अडचणींमुळे लाखो महिलांना नियमित लाभापासून वंचित राहावे लागले आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्याने तसेच काही ठिकाणी कागदपत्रांतील त्रुटींमुळे अनेक महिलांचे अनुदानाचे हप्ते ऑक्टोबरनंतर थांबविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, काही महिलांनी ई-केवायसी पूर्ण करूनही त्यांच्या खात्यात नियमित १५०० रूपयांची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून, काही भागांत तर संतप्त महिलांनी थेट रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याचेही चित्र पाहायला मिळाले आहे.
e-KYC ई-केवायसी झाली का तात्काळ पहा लाडक्या बहिणींची यादी जाहीर यादीत नाव पहा
या पार्श्वभूमीवर, महिला व बालविकास विभागाने गंभीर दखल घेत संबंधित लाभार्थी महिलांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष चौकशी करण्याचे आदेश अंगणवाडी सेविकांना दिले आहेत. त्यानुसार, सखोल पडताळणी होणे अपेक्षित आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत संबंधित महिलांची ई-केवायसी पडताळणी पूर्ण न झाल्यामुळे हा लाभ रखडला असून, या प्रक्रियेची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपविण्यात आली आहे. मात्र, सर्वच अंगणवाडी सेविकांनी ही जबाबदारी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिल्याने संपूर्ण यंत्रणाच ठप्प झाली आहे. राज्य शासनाने योजनेतील लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत व पारदर्शक राहावी, यासाठी ई-केवायसी पडताळणी अनिवार्य केली आहे. याच अनुषंगाने जिल्हास्तरावरून तालुकास्तरावर लाभार्थी महिलांच्या याद्या रवाना करण्यात आल्या. मात्र, प्रत्यक्षात या पडताळणीचे काम कोण करणार, यावरच संभ्रम निर्माण झाला आहे.
e-KYC ई-केवायसी झाली का तात्काळ पहा लाडक्या बहिणींची यादी जाहीर यादीत नाव पहा
दरम्यान, महिला व बाल विकास विभागामार्फत अंगणवाडी सेविकांवर अतिरिक्त कामाचा बोजा टाकण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. मानधन वाढ, कामाचा ताण, तांत्रिक अडचणी आणि मोबदल्याचा अभाव या कारणांमुळे ई-केवायसी पडताळणीचे काम करण्यास त्यांनी सपशेल नकार दिला आहे. परिणामी, अद्याप एकाही तालुक्यात प्रत्यक्ष पडताळणीची प्रक्रिया सुरू होऊ शकलेली नाही. या संदर्भात जळगाव येथील महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंत भदाणे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी लाभार्थी महिलांच्या याद्या तालुकास्तरावर पाठविण्यात आल्या आहेत, असे सांगितले. मात्र, ई-केवायसी पडताळणीची प्रक्रिया कुठपर्यंत पोहोचली आहे, याबाबत ठोस माहिती देणे त्यांनी टाळले. त्यामुळे त्यांच्या उत्तरातून प्रशासनातीलगोंधळ स्पष्ट झाला.