Ladki Bahin Yojana eKYC: २० लाख लाडक्या बहि‍णींचे ₹१५०० कायमचे बंद, ईकेवायसीबाबत महत्त्वाची अपडेट

 

 

Ladki Bahin Yojana eKYC Update: लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे लाभ बंद झाले आहेत. या योजनेतील २० लाख महिलांची पुन्हा पडताळणी करण्यात येणार आहे. आता अंगणवाडी सेविकांनी ही पडताळणी करण्यास नकार दिला आहे.२० लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद

 

केवायसीमधील चुकांमुळे लाभ बंद

 

आता पुन्हा पडताळणीमध्येही अडचणी

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाखो महिलांचा लाभ थांबवला आहे. या योजनेच्या तब्बल २० लाख महिलांचे ई केवायसीतील चुकांमुळे लाभ बंद झाला आहे. या महिलांची आता ई केवायसी पुन्हा सुरु झाली आहे. यामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यातील महिलांचा समावेश आहे. जळगावमधील १ लाख महिलांचा लाभ बंद झाला आहे.

 

 

 

यादी पहाण्यासाठी येथे क्लिक करा 

 

२० लाख महिलांचा केवायसी न केल्याने लाभ बंद झाला आहे. या महिलांची पडताळणी करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर आहे. मात्र, ही पडताळणी फक्त नावालाच सुरु असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत लोकसत्ताने वृत्त दिले आहे.

 

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गरीब कुटुंबातील महिलांसाठी खूप महत्त्वाची आहे. या योजनेद्वारे महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. दरम्यान, योजनेत ई केवायसी करणे अनिवार्य केले होते.अनेक महिलांनी ई केवायसीमध्ये चुकीची उत्तरे दिली आहेत त्यामुळे त्यांचा लाभ थांबवण्यात आला आहे. नोव्हेंबरपासून महिलांना लाभ मिळाला नाही.

 

याच पार्श्वभूमीवर महिला व बालविकास विभागाने गंभीर दखल घेतली आहे. महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी करण्याचे आदेश अंगणवाडी सेविकांना दिले आहे. दरम्यान, आता सर्व अंगणावाडी सेविकांनी हे काम करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पडताळणी थांबवली आहे. यामुळे हे काम कोण करणार असा प्रश्नच आहे.

 

 

यादी पहाण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment

error: Content is protected !!