L
Ladki bahin yojana eligibility 80000 applications rejected महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेला यंदा एक वर्ष पूर्ण झाले आहे. राज्य सरकारने गेल्या वर्षी १८ जून २०२४ रोजी अर्थसंकल्पात ही योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत देण्याचे उद्दिष्ट होते. त्यानुसार, पात्र महिलांच्या खात्यात नियमितपणे रक्कम जमा होत होती. मात्र, आता एकापाठोपाठ एक धक्के बसत असून, ८० हजारांहून अधिक अर्ज राज्य सरकारने रद्द केले आहेत, ज्यामुळे ‘लाडक्या बहिणींना’ मोठा फटका बसला आहे.
वगळण्यात येणाऱ्या महिलांची नावे पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
सध्या राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारने काही निकष निश्चित केले आहेत. यामुळे आयकर विभागाकडून सध्या छाननी सुरू आहे. महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील जालना आणि नागपूर या दोन्ही जिल्ह्यांतील अनेक महिलांना याचा मोठा धक्का बसला आहे. आयकर विभागाच्या तपासणीनंतर विविध कारणांमुळे हजारो अर्ज अपात्र ठरले आहेत, ज्यामुळे अनेक महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहेत.
वगळण्यात येणाऱ्या महिलांची नावे पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
जालना जिल्ह्यात ५७ हजार अर्ज बाद
जालना जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी एकूण ५ लाख ४२ हजार ३९२ अर्ज दाखल झाले होते. मात्र, आयकर विभागाकडून सुरू असलेल्या पडताळणीमध्ये जवळपास ५७ हजार अर्ज बाद करण्यात आले आहेत. वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असणे, कुटुंबात सरकारी नोकरदार सदस्य असणे, चारचाकी वाहन असणे, विहित वयोमर्यादेपेक्षा जास्त वय असणे आणि संजय गांधी निराधार योजनेसह इतर योजनांचा लाभ घेत असतानाही ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करणे, यांसारख्या विविध कारणांमुळे हे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत.
वगळण्यात येणाऱ्या महिलांची नावे पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या छाननीनंतर आता जालना जिल्ह्यातील पात्र लाभार्थी महिलांची संख्या ४ लाख ८४ हजार ६९४ इतकी झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून या योजनेसाठी नवीन नोंदणी बंद झाली आहे. नुकत्याच अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात आता रक्कम जमा होणार नाही, असे महिला आणि बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच, जालना जिल्ह्यातील ६५ महिलांनी स्वतःहून या योजनेचा लाभ सोडला आहे.
नागपूर जिल्ह्यात ३० हजार अर्ज अपात्र
नागपूर जिल्ह्यातही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला फटका बसला आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण १० लाख ७३ हजार महिलांनी अर्ज केले होते, त्यापैकी साधारण ३० हजार ‘लाडक्या बहिणीं’चे अर्ज प्राथमिक पडताळणीत बाद झाल्याची माहिती समोर आली आहे. यात कार असलेल्या महिला, आयकर भरणारे कुटुंबिय असलेल्या महिला आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिलांच्या अर्जांचा समावेश आहे. हे सर्व अर्ज प्रामुख्याने अपात्र ठरले आहेत.
सध्याही ‘लाडक्या बहिणीं’च्या कागदपत्रांची पडताळणी सुरु आहे, त्यामुळे नागपूर जिल्ह्यात अपात्र होणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत ‘किंग मेकर’ ठरलेल्या या योजनेतील मोठ्या प्रमाणात अर्ज बाद केले जात असल्याने सध्या ‘लाडक्या बहिणीं’मध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.