गॅस सिलेंडर हवाय मग आधी ‘हे’ काम करा; इराण-इस्रायल युद्धामुळे केंद्र सरकारचा मोठा निर्णय

 

 

LPG New Rule : पश्चिम आशियातील इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता भारतीय ग्राहकांच्या स्वयंपाकघरात उमटू लागले आहेत. इराणकडून होणाऱ्या एलपीजी पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्यामुळे देशात गॅस टंचाईची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने गॅस सिलेंडरचा काळाबाजार आणि ओव्हरबुकिंग रोखण्यासाठी कठोर पावले उचलली असून, ‘बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण’ पूर्ण न करणाऱ्या ग्राहकांचा गॅस पुरवठा रोखला जाणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

 

 

 

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

होर्मुजच्या सामुद्रधुनीचा अडथळा आणि एलपीजी संकटजागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ‘होर्मुजची सामुद्रधुनी’ सध्या युद्धाच्या सावटाखाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतासाठी येणारा सुमारे ३ लाख मेट्रिक टन एलपीजीचा साठा या भागात अडकून पडला आहे. यामुळे आगामी काळात गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने, सरकारने उपलब्ध साठ्याचे योग्य नियोजन करण्यासाठी केवायसीची प्रक्रिया वेगवान केली आहे.

 

 

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

 

 

काय आहे नवा नियम?

 

केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, घरगुती एलपीजी सेवा आणि सबसिडीचा लाभ घेत राहण्यासाठी सर्व ग्राहकांना बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण किंवा ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे.

पुरवठा रोखणार : ज्या ग्राहकांचे केवायसी पूर्ण नसेल, त्यांना बुकिंग करूनही सिलेंडरची डिलिव्हरी दिली जाणार नाही. 

कोणासाठी अनिवार्य? : ज्या ग्राहकांनी अद्याप एकदाही बायोमेट्रिक पडताळणी केलेली नाही, त्यांच्यासाठीच ही प्रक्रिया अनिवार्य आहे. ज्यांनी आधीच ही प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांना पुन्हाकरण्याची गरज नाही.

 

Leave a Comment

error: Content is protected !!