Lunar Eclipse : 3 मार्चला चंद्रग्रहण साध्या डोळ्यांनीही पाहता येणार; मुंबई-पुण्यात किती वाजता पाहता येईल? चंद्रग्रहणाविषयी भीती पसरवली जात आहे, ती योग्य नाही. हे विज्ञानयुग आहे. शिक्षक-पालकांनी मुलांना चंद्रग्रहण दाखवून त्याविषयी माहिती करून द्यायला पाहिजे, असंही सोमण यावेळी म्हणाले
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
यंदाच्या वर्षी होळी आणि धुळीवंदन कधी असेल याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. दरम्यान सोमवार 2 मार्च रोजी होलिका दहन करायचे असून धूलिवंदन मंगळवारी 3 मार्च रोजी असल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितलं. दा.कृ.सोमण म्हणाले, की यावर्षी सोमवार 2 मार्च रोजी सायं. 5 वाजून 55 मिनिटांनी फाल्गुन पौर्णिमा सुरू होते. त्या दिवशी प्रदोष काळात पौर्णिमा आहे. तसेच मंगळवार 3 मार्च रोजी ग्रस्तोदित चंद्रग्रहण आहे. त्यामुळे धर्मसिंधूत सांगितल्याप्रमाणे पूर्वदिवशी म्हणजे सोमवार 2 मार्च रोजी होलिका दहन करावे. सोमवारी 2 मार्च रोजी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात भद्राकालातही होलिका दहन करता येते हेही . दा.कृ.सोमण यांनी स्पष्ट केले.
साध्या डोळ्यांनीही चंद्रग्रहण पाहता येणार…
येत्या मंगळवारी 3 मार्च ग्रहणातच चंद्र उगवताना आपल्याला साध्या डोळ्यांनी पाहता येणार असल्याचे खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांनी सांगितले. चंद्रग्रहण हा एक नैसर्गिक अविष्कार आहे, तो सर्वांनी साध्या डोळ्यांनी पाहायला हवा. सध्या काही प्रसार माध्यमातून या चंद्रग्रहणाविषयी भीती पसरवली जात आहे, ती योग्य नाही. हे विज्ञानयुग आहे. शिक्षक-पालकांनी मुलांना चंद्रग्रहण दाखवून त्याविषयी माहिती करून द्यायला पाहिजे, असंही सोमण यावेळी म्हणाले.
माहितीसाठी येथे क्लिक करा