MahaDBT Farmer Lottery List : महाराष्ट्र सरकारच्या महाडीबीटी (mahaDBT) पोर्टलवरून राबवली जाणारी कृषी यांत्रिकीकरण योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आधुनिक कृषी यंत्रसामग्री खरेदीसाठी आर्थिक मदत देणे, जेणेकरून शेतीचे काम सुलभ, वेगवान आणि उत्पादनक्षम बनू शकेल. अलीकडेच कृषी विभागाने या योजनेसाठी अर्ज मागवले होते, आणि आता या अर्जांवर लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांची यादी महाडीबीटी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली असून, संबंधित शेतकऱ्यांना याबाबत मेसेजद्वारे देखील कळवण्यात आले आहे. यादीत नाव आलेल्या शेतकऱ्यांना आता पुढील सात दिवसांत आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे.
यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
या योजनेत ट्रॅक्टर, पॉवर टिलर, कडबा कटर, नांगर, मल्चिंग मशीन, बियाणे पेरणी यंत्र, शेंगदाणा गोडी काढणारे यंत्र, वाफा तयार करणारे यंत्र, इत्यादी आधुनिक यंत्रसामग्रीसाठी अनुदान दिले जाते. यंत्राचा प्रकार आणि किंमतीनुसार अनुदानाची टक्केवारी वेगवेगळी असते. काही प्रकरणांमध्ये हे अनुदान ५० ते ७० टक्क्यांपर्यंत असते. यात अनुसूचित जाती-जमाती व महिला शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते.
लॉटरी यादीत निवड झालेल्यांनी पुढील प्रक्रिया वेळेत पूर्ण करणं अत्यावश्यक आहे. या प्रक्रियेमध्ये संबंधित यंत्रासाठीचे कोटेशन, सातबारा उतारा (७/१२), होल्डिंग प्रमाणपत्र, ट्रॅक्टर असलेल्या यंत्रासाठी वाहनाची आरसी बुक, निवड झालेल्या यंत्राचा चाचणी अहवाल (टेस्ट रिपोर्ट), आधार कार्ड, बँक पासबुक, आणि अन्य मागवलेली कागदपत्रे अपलोड करावी लागतात. ही कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, संबंधित अधिकाऱ्यांकडून पडताळणी केली जाते आणि त्यानंतर पूर्वसंमती प्रमाणपत्र (Pre-Sanction Order) जारी केले जाते. यानंतरच अनुदानाची रक्कम मंजूर होते आणि शेतकऱ्यांना यंत्र खरेदी करण्यासाठी अधिकृत मंजुरी मिळते.
यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ही यादी पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटवर जावे (https://mahadbt.maharashtra.gov.in). त्यानंतर “Fund Disbursed Report” हा पर्याय निवडावा, जिल्हा, तालुका आणि गावाची माहिती भरल्यावर संबंधित गावातील यादी आणि आपले नाव दिसते. यादीत आपले नाव असल्यास लवकरात लवकर कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. विलंब केल्यास अनुदानाच्या प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात आणि आपली निवड रद्द होऊ शकते.
यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
शेतकऱ्यांनी अर्ज करताना निवडलेल्या यंत्राचे कोटेशन विश्वसनीय व अधिकृत विक्रेत्याकडून घ्यावे. तसेच टेस्ट रिपोर्ट ही संबंधित यंत्राच्या दर्जाची खात्री करणारे महत्त्वाचे दस्तऐवज आहे. अनेक वेळा बोगस विक्रेत्यांकडून चुकीच्या कोटेशन व रिपोर्ट दिले जातात, त्यामुळे योग्य पुरवठादाराची निवड करणे आवश्यक आहे. शासनाने मान्य केलेल्या यंत्र उत्पादकांची यादी देखील महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध आहे.
संपूर्ण प्रक्रियेत कोणतीही अडचण असल्यास आपल्या तालुक्यातील कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक किंवा सेवा केंद्रावर संपर्क साधावा. याशिवाय जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय किंवा महाडीबीटी हेल्पलाइनवर संपर्क करूनही मार्गदर्शन घेता येते. याद्वारे ही योजना पारदर्शक व शेतकरीहित साधणारी बनते.