Maharashtr band मुंबई महानगरपालिकेवर भगवा कोणाचा फडकणार आणि राज्याचा प्रथम नागरिक होण्याचा मान कोणाला मिळणार, याचा फैसला आता अंतिम टप्प्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आज वर्षा निवासस्थानी एक अत्यंत महत्त्वाची बैठक होण्याची दाट शक्यता आहे. या संभाव्य बैठकीत मुंबईसह ठाणे, पुणे आणि नाशिकसारख्या महत्त्वाच्या महापालिकांमधील सत्तास्थापनेच्या सूत्रावर चर्चा होऊ शकते. मुंबईतील संख्याबळाची जुळवाजुळव, मित्रपक्षांची भूमिका आणि अपक्षांना सोबत घेण्याची रणनीती यावर दोन्ही नेते शिक्कामोर्तब करण्याची चिन्हे आहेत. महायुतीचा महापौर बसवण्यासाठी जागावाटपाचा कोणता फॉर्म्युला ठरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीनंतर मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
चाळीसगाव तालुक्यातील टाकळीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला असून, नायलॉनच्या मांजामुळे दुचाकीस्वार तरुणाचा गळा चिरला आहे. दिनेश पाटील असे या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून, त्याला उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सांगली जिल्हाध्यक्षांचा भाजपात प्रवेश
राजू शेट्टी यांचे खंदे आणि विश्वासू समर्थक महेश खराडेंचा पदाधिकाऱ्यांसह भाजपात प्रवेश
सांगलीत पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश
महेश खराडेंच्या भाजपा प्रवेशामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठा हादरा
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.डिसेंबर महिन्यात त्यांचं निधन झालं होते. त्याच सोबत लोक प्रबंधन क्षेत्रात के. टी. थॉमस यांना, केरळच्या एन. राजम यांना कला क्षेत्रात तर उत्तर प्रदेशातील पी. नारायणन यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात तर केरळच्या व्ही. एस. अच्युतानंदन (मरणोत्तर) पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
धाराशिवमध्ये शिवसेनेच्या दोन गटात राडा झाला असून पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत दोन गटात राडा झाला आहे. शिवसेनेचे अजित पिंगळे आणि अविनाश खापे यांच्यात बाचाबाची झाली असून शिवसेनेतील कथित ऑडिओ क्लिपनंतर प्रचंड गोंधळ झाला आहे.
नाशिक – आदिवासी शेतकरी आंदोलक उद्या मुंबईच्या दिशेने येणार
विविध प्रलंबित मागण्यांसाठी हजारो आदिवासी शेतकरी पायी चालत मुंबईच्या दिशेने निघाले आहे.आज नाशिक शहराबाहेर राजुर बहुला येथे त्यांचा मुक्काम असून त्यानंतर उद्या पुन्हा मुंबईच्या दिशेने होणार रवाना आहे.
जेवढी गर्दी बारमध्ये होते, त्यापेक्षा कमी गर्दी मंदिरात होते. सोशल डिस्टन्स ठेवून मंदिरे उघडण्यास काय हरकत आहे, अशी सणसणीत टीका आज मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथे एबीपी माझा सोबत बोलताना केली. आज माजी दिवंगत आमदार सुधाकर परिचारक यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमात ते आले होते.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
आम्हा हिंदूंचे 33 कोटी देव आहेत, आम्हाला कुठेही देव भेटतो. मात्र, अनेक गरीब लोकांची उपजीविका मंदिरावर अवलंबून आहे. हारवाला ते पुजारी असंख्य गरीब लोकांची उपजीविका मंदिरावर अवलंबून आहे. त्यांच्यासाठी मंदिरं उघडा, मंदिरे बंद ठेवणे ही सरकरकची चूक आहे. तुम्ही दारूची दुकाने उघडी ठेवता. मात्र, मंदिरे बंद ठेवता म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
लसींचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी 15 ऑगस्टपासून रेल्वे लोकल सेवा सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. त्यासाठी एक विशिष्ट यंत्रणा तयार करण्यात येणार असून, लवकरच ती सुरु करण्यात येणार आहे. पण ही यंत्रणा नक्की काम कशी करणार, याबाबत सर्वसामांन्यांच्या मनात गोंधळ आहे. त्याबाबतची माहिती जाणून घेऊया.
लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल ट्रेन प्रवासासाठी विशिष्ट पास देण्यात येणार आहेत. या पासवर क्यूआर कोड असणार आहे. हा पास ‘युनिव्हर्सल पास’ म्हणून ओळखला जाईल. हा पास लोकल ट्रेनसोबतच मेट्रो, मोनोरेल त्याचप्रमाणे मॉल किंवा इतर ठिकाणी सुद्धा चालू शकणार आहे.
शाळांच्या बाबतही राज्य सरकार गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचा फटका विद्यार्थी आणि पालकांना बसत आहे. शाळेबाबत धरसोड धोरण न ठेवता एक निश्चित धोरण राबविल्यास पालक आणि विद्यार्थी संभ्रमात राहणार नाहीत, असा टोला लगावला. यावेळी खासदार रणजित निंबाळकर, खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, आमदार प्रशांत परिचारक, समाधान आवताडे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार विजय देशमुख, आमदार राहुल कुल, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राम सातपुते आणि आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते.
राज्यात अनेक निर्बंधात सूटराज्यात हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्स आणि दुकानांना रात्री 10 पर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच लग्नकार्य, खाजगी कार्यालय यांच्याही निर्बंधामध्ये सूट देण्यात आली आहे.
जेवढी गर्दी बारमध्ये होते, त्यापेक्षा कमी गर्दी मंदिरात होते. सोशल डिस्टन्स ठेवून मंदिरे उघडण्यास काय हरकत आहे, अशी सणसणीत टीका आज मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथे एबीपी माझा सोबत बोलताना केली. आज माजी दिवंगत आमदार सुधाकर परिचारक यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमात ते आले होते.
आम्हा हिंदूंचे 33 कोटी देव आहेत, आम्हाला कुठेही देव भेटतो. मात्र, अनेक गरीब लोकांची उपजीविका मंदिरावर अवलंबून आहे. हारवाला ते पुजारी असंख्य गरीब लोकांची उपजीविका मंदिरावर अवलंबून आहे. त्यांच्यासाठी मंदिरं उघडा, मंदिरे बंद ठेवणे ही सरकरकची चूक आहे. तुम्ही दारूची दुकाने उघडी ठेवता. मात्र, मंदिरे बंद ठेवता म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागून १० दिवस उलटले तरी, अद्याप मुंबईला नवीन महापौर मिळू शकलेला नाही. महापौरपद आणि स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यात सुरू असलेल्या अंतर्गत ओढाताणीमुळे महायुतीमधील पेच अधिकच गडद झाला
नवी मुंबईत पोलीसांनी धाड टाकली. तेव्हा घरात महिला एकटी झोपलेली होती. महिला पोलीस कर्मचारी पण सोबत होते. बांगलादेशची असणारी पण गेल्या १२ वर्षापासून अस्मा पॉली ही कोपरी गाव इथ राहत आहे. नवी मुंबई कोपरी गाव सेक्टर २६ मध्ये ती राहत होती. मात्र तुझ्यावर कारवाई करणार म्हणून पोलीसांनी या आधी तिच्या मैत्रिणीकडून जवळपास ५ लाख रुपये काढले होते. मात्र घरात कारवाई करत असताना एक एजेंट हा पोलिसांच्या सोबत होता. जेव्हा असमा ला पोलीसांनी गाडीत बसवलं तेव्हा घराची सदा झडती करण्यात आली. मात्र तिने पोलीस तक्रारी जे काही सांगितलं ते मात्र धक्कादायक होते.
मीरा भाईंदर येथील फ्लायओव्हर संदर्भात एक व्हिडीओ कालपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मेट्रो लाईन ९ प्रकल्पाचा भाग असलेल्या या डबल डेकर फ्लायओव्हरचे उद्घाटन फेब्रुवारी महिन्यात करण्यात येणार आहे. मनसेने या कामाबाबत आक्षेप घेतला असून हे काम भ्रष्टाचारासाठी आणि काही राजकीय लोकांना फायदा देण्यासाठी करण्यात आल्याचा गंभीर आरोप मनसेचे शहर अध्यक्ष संदीप राणे यांनी केला आहे. मनसेच्या आरोपानंतर MMRDA ने याबाबत अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. काय आहे मनसेचा आरोप? MMRDA ने नक्की काय स्पष्टीकरण दिले आहे