Maharashtra Government Formation : विधानसभा निवडणुकीत काकांना अस्मान दाखवल्यावर अजित पवार आता पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. अजित पवार हे आपले काका ज्येष्ठ नेते शरद पवारांना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहेतहे आपले काका ज्येष्ठ नेते शरद पवारांना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या शरद पवारांचे उमेदवार गळाला लावण्याचा प्रयत्न अजित पवारांकडून सुरू आहे. शरद पवारांचे काही खासदार आणि आमदार हे सीमोल्लंघन करण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने हा दावा केला
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि काका शरद पवार यांच्याशी फारकत घेत अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या 40 आमदारांसह महायुतीत प्रवेश केला. त्यानंतर राज्यात अजित पवार विरुद्ध शरद पवार असा राजकीय संघर्ष सुरू झाला. या संघर्षातील पहिल्या टप्प्यात लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना शरद पवारांनी जोरदार धोबीपछाड दिला. तर, दुसरा राजकीय संघर्ष हा विधानसभेत दिसून आला. यामध्ये अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची सव्याज परतफेड केली. विधानसभा निवडणुकीत शरद पवारांचे फक्त 10 उमेदवार विजयी झाले.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा