Manikrao Kokate Video : माणिकराव कोकाटे यांनी काहीही स्पष्टीकरण दिलं असलं तरी त्यांचे कृत्य हे आमच्यासाठी भूषणावह नाही अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली होती.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
विधानसभेत रमी खेळताना व्हिडीओ व्हायरल झालेल्या प्रकरणी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे मंगळवारी त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर कोकाटे आणि अजित पवार यांचे फोनवरुन संभाषण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यावर माणिकराव कोकाटे मंगळवारील सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.
अधिक माहिती पहाण्यासाठी येथे क्लिक करा
विधानसभेत कामकाज सुरू असताना माणिकराव कोकाटे हे मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ आमदार रोहित पवार यांनी शेअर केला होता. त्यानंतर विरोधकांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. गेल्या दोन दिवसात या प्रकरणावरुन राज्य सरकार बॅकफूटवर गेल्याचं दिसून आलं.
मुख्यमंत्र्यांची नाराजी
या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही जाहीर नाराजी व्यक्त केली. सभागृहात असताना गांभीर्य असणं गरजेचं आहे. माणिकराव कोकाटे यांनी काहीही स्पष्टीकरण दिलं असलं तरी ते आमच्यासाठी भूषणावह नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
अजितदादांचा फोन अन् कोकाटेंची बैठक
मुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्याशी फोनवरुन संवाद साधल्याची माहिती सूत्रांनी दिली. अजित पवार यांच्या फोननंतर माणिकराव कोकाटे यांनी महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची सिन्नर येथील दूध संघाच्या कार्यालयात बैठक घेतली.
अधिक माहिती पहाण्यासाठी येथे क्लिक करा
पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार
अजित पवार आणि कोकाटे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, तसेच माणिकराव कोकाटेंनी बोलावलेल्या बैठकीत काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मंगळवारी सकाळी 9 वाजता माणिकराव कोकाटे सिन्नरला पत्रकार परिषद घेणार आहेत. पत्रकार परिषदेत काही निर्णय जाहीर करतात का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे. मात्र, अजित पवार यांच्या फोनबाबत कृषिमंत्र्यांकडे विचारणा केली असता अजित पवारांचा फोन आला नसल्याची कोकाटे यांनी एबीपी माझाला माहिती दिली.