महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता १५ जिल्ह्यांना ‘यलो’ अलर्ट! वादळी वारे आणि गारपिटीचा धोका

 

Mansoon 2025 मॉन्सूनने अंदमानमध्ये मुक्काम घेतला असून, हवामान विभागाने राज्यात पुढील पाच दिवस वादळी पावसाचा इशारा दिला आहे. अंदमानमध्ये पोहचल्यानंतर मॉन्सूनने आज त्याच भागात मुक्काम केला असून, पोषक हवामानामुळे पुढील २ ते ३ दिवसांत तो आणखी काही भागात प्रगती करेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

 

हवामान खात्याच्या माहितीनुसार, राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांत पुढील पाच दिवस वादळी पावसाची शक्यता आहे.

 

मॉन्सूनने याआधी दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग, दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे आणि उत्तर अंदमान समुद्रात प्रगती केली होती. मात्र आज मॉन्सूनचा मुक्काम याच भागात आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत तो दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, कोमोरिनचा काही भाग, संपूर्ण अंदमान आणि निकोबार बेटे तसेच मध्य बंगालच्या उपसागरात प्रगती करेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

 

राज्यातील अनेक भागांत मागील चार दिवसांपासून पाऊस सुरू असून, ढगाळ हवामानामुळे तापमानातही घट झाली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या मशागतीच्या कामांवर परिणाम झाला असून, काही भागांत पिकांचेही नुकसान झाले आहे.

 

विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांत काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात जालना, बीड, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यांतही वादळी पावसासाठी पोषक वातावरण आहे.

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, अहमदनगर (अहिल्यानगर) आणि नाशिक जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतही पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यांमध्येही वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

 

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!