एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! एसटी प्रवासात मिळणार 10-15 टक्के सवलत 

 

MSRTC Flexi fare Yojana: एसटी प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता कमी गर्दीच्या हंगामात प्रवास करताना अगाऊ आरक्षण केल्यास त्यांना १० ते १५ टक्के सवलत मिळणार आहे. एसटी महामंडळाच्या वर्धापनदिनी फ्लेक्सी फेअर योजना (Flexi fare scheme) चा शुभारंभ केला जाणार असल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

 

 

 

 विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि ग्रामीण महिलांसह लाखो प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवण्यासाठी गेले अनेक वर्षे अविरतपणे वाहतूक सेवा पुरवत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात एसटीने आपल्या वाहतुकीचे जाळे पसरवले आहे आणि दररोज लाखो प्रवाशांची सुरक्षित ने-आण करण्याची जबाबदारी ती इमानेइतबारे पार पाडत आहे.

 

कोरोना काळात एसटीच्या प्रवासी संख्येत मोठी घट झाली होती. मात्र, आता प्रवासी संख्या पूर्वपदावर आणण्यासाठी एसटी महामंडळाकडून विविध नवीन योजना आणल्या जात आहेत. यामुळे दिवसेंदिवस एसटीचा प्रवासीवर्ग पुन्हा वाढत आहे.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

दिवाळी, गणपती, दसरा यांसारख्या सणासुदीच्या काळात प्रवास करणे म्हणजे प्रवाशांसाठी एक मोठी कसरतच असते. कारण या काळात प्रचंड गर्दीमुळे गाड्यांमध्ये जागा मिळणे खूप कठीण होते.

 

मुंबईत राज्यभरातून अनेक नागरिक नोकरी आणि व्यवसायासाठी स्थायिक झाले आहेत. सणांसाठी गावी जाणाऱ्या या चाकरमान्यांना सध्या खाजगी बसच्या तिकिटासाठी दुप्पट ते अडीचपट अधिक पैसे मोजावे लागत आहेत, ज्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

 

एसटी महामंडळाच्या सध्याच्या धोरणामुळे, कमी गर्दीच्या हंगामात (ऑफ सिझन) तिकिटांचे दर कमी केले जात नाहीत, ज्यामुळे प्रवाशांचा कल इतर पर्यायांकडे वाढतो आणि एसटीचा प्रवासीवर्ग कमी होतो. या समस्येवर उपाय म्हणून, एसटी महामंडळ लवकरच एक नवीन योजना सुरू करत आहे, ज्या अंतर्गत प्रवाशांना ऑफ सिझनमध्ये आगाऊ तिकीट आरक्षण (Pre Reservation) केल्यास सवलत मिळणार आहे.

 

या नवीन योजनेनुसार, कमी गर्दीच्या हंगामात जुलै ते सप्टेंबर आणि जानेवारी ते मार्च या कालावधीत, आगाऊ तिकीट आरक्षित करणाऱ्या प्रवाशांना तिकिटाच्या दरावर दहा ते पंधरा टक्के सवलत मिळेल. ही योजना केवळ आरक्षणासाठी उपलब्ध असलेल्या बसेसना लागू असेल.

 

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!