MSRTC Free Travel Scheme : या नागरिकांना मिळणार एसटीत मोफत प्रवास, शासन निर्णय आला

Msrtc Free travel : ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी बस चा प्रवास मोफत होणार. मोफत प्रवासासाठी स्मार्ट कार्ड दिले जाणार !

नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या पोस्टमध्ये ग्रामीण व शहरी भागातील प्रवासाचा मुख्य साधन म्हणून आपण एसटी महामंडळाच्या बस कडे पाहतो. या बसच्या सहाय्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी आपल्या शाळेसाठी जात असतात. वृद्ध प्रौढ व विद्यार्थी या सर्वांसाठी एसटी बसचा प्रवास जिव्हाळ्याचा असतो म्हणून एसटी महामंडळ सुद्धा आपल्या सर्वांसाठी नवनवीन प्रवासाच्या योजना राबवत असते. अशाच योजनेपैकी मोफत प्रवास ही एक योजना भारत देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत. या योजनेमुळे अनेक लोकांना दिलासा आणि आनंद मिळालेला आहे.चला तर मग या योजनेविषयी जाणून घेऊया.

Msrtc travel : देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील राज्यातील जेष्ठ नागरिकांसाठी एसटीचा मोफत प्रवास योजना महाराष्ट्र राज्याच्या सरकारने आणलेली आहे या योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप सुद्धा झालेले आहे.

मोफत प्रवास करण्यासाठी स्मार्ट कार्ड नोंदणी

Msrtc : राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांची 34 लाख लोकांची स्मार्ट कार्ड वर नोंदणी झालेली आहे. त्यातील 75 वर्षावरील जेष्ठ नागरिकांची संख्या जवळपास 14 लाख 69 हजार आहे आणि आपल्या राज्यात 65 वर्षावरील वय असणाऱ्या नागरिकांना 50 % प्रवासासाठी सवलत दिली जात आहे.
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे निमित्त साधून मुख्यमंत्र्यांनी 16 ऑगस्ट 2022 रोजी 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी मधील मोफत प्रवास योजनेची घोषणा केली होती मित्रांनो या योजनेसाठी काही नियम व अटी लागू करण्यात आल्यास या नवीन अटी विषयी जाणून घेऊया.

Back to top button
error: Content is protected !!