MSRTC ST Bus : परळ बसस्थानकातील घटनेनंतर परिवहन विभागाने नवीन कडक नियम लागू केले आहेत. यापुढे प्रत्येक फेरी सुरू करण्यापूर्वी बसचालक आणि वाहकांची अल्कोहोल तपासणी (अल्कोटेस्ट) करणे अनिवार्य करण्यात आले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुरक्षेच्या दृष्टीने हे आदेश जारी केले आहेत. सार्वजनिक प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) सेवेत असताना मद्यपानामुळे होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. आगारात हजर होणाऱ्या सर्व चालकांची दररोज अल्कोटेस्ट मशीनद्वारे तपासणी करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. तपासणीची योग्य नोंद करूनच चालकांना कर्तव्यावर पाठवले जाणार आहे. ही माहिती परिवहन मंत्री
परळ बसस्थानकातील घटनेनंतर कठोर निर्णय
25 जानेवारी रोजी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबईतील परळ बसस्थानकाची अचानक पाहणी केली होती. या पाहणीत चालक आणि वाहकांसाठी असलेल्या विश्रांतीगृहांमध्ये मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. तसेच काही कर्मचारी मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत आढळल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने अधिक क
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
चौकशी समितीचा अहवाल सादर; कारवाई प्रक्रिया सुरू
या प्रकरणाच्या अनुषंगाने एसटी प्रशासनाने तीन अधिकाऱ्यांची स्वतंत्र चौकशी समिती स्थापन केली. समितीने प्रकरणाची सखोल तपासणी करून दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचवण्यात आल्या असून, त्यानुसार पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.
हा चौकशी अहवाल एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांना सादर करण्यात आला असून त्यांच्या सूचनांनुसार दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. समितीने सुचवलेल्या सुरक्षाविषयक उपाययोजना राज्यातील सर्व आगारांमध्ये तातडीने लागू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य