New GR नियम मोडणाऱ्या वाहनाचेखाजगी मोबाइलद्वारे छायाचित्र काढून चालान फाडल्यास आता वाहतूक पोलिसांवरच शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. राज्याच्या वाहतूक विभागाचे अपर पोलिस महासंचालक प्रवीण साळुंके यांनी नुकतेच याबाबतचे परिपत्रक जारी केले.
शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा
काय म्हटले आहे परिपत्रकात?
या बैठकीनंतर राज्याचे वाहतूक विभागाचे अपर पोलिस महासंचालक प्रवीण साळुंके यांनी राज्यभरातील वाहतूक पोलिसांसाठी परिपत्रक जारी केले. त्यातील आदेशानुसार :
-वाहतुकीचे नियमन करताना अधिकारी, अंमलदार खाजगी मोबाइलद्वारे एकाच वेळी मोठ्या संख्येने छायाचित्रे काढून सोयीनुसार चालान पाठवितात.
-अशा प्रकारे मोबाइलद्वारे छायाचित्र काढून ई-चालान केल्यास पोलिस अधिकारी, अंमलदारांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.
-वाहतूक पोलिसांनी यासाठी केवळ ई-चालानचाच वापर करावा, अशी कडक सूचना या परिपत्रकानंतर वाहतूक पोलिसांना करण्यात आली आहे.
मेगापिक्सेलची अडचण
यापूर्वी मोबाइलद्वारे छायाचित्र काढून दंड आकारण्यावर आक्षेप नोंदवले गेले होते.
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
यापूर्वी मोबाइलद्वारे छायाचित्र काढून दंड आकारण्यावर आक्षेप नोंदवले गेले होते. खंडपीठातदेखील याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली होती. अपर पोलिस महासंचालक कार्यालयाकडून दोन वेळा अशाच प्रकारे परिपत्रक जारी झाले. मात्र, वाहतूक पोलिसांकडून मोबाइलद्वारेच छायाचित्र काढून ई-चालान मशीनवर अपलोड करून नंतर दंड आकारण्यात येतो. ई-चालान मशीनचे मेगापिक्सेलच कमी असल्याने त्याद्वारे चालत्या, वेगात असलेल्या वाहनाचे छायाचित्र काढणे कठीण असल्याचेमत वाहतूक पोलिसांनी नोंदवले.
