सुनेत्रा पवारांच्या खांद्यावर हात टाकल्याने रोहित पवार संतापले, नेत्यांना थेट सुनावले..!Rohit Pawar on Praful Patel..|

 

 

 

 

Rohit Pawar on Praful Patel रोहित पवारांनी सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर गंभीर आरोप केले आहेत. दादांच्या निधनाच्या चौथ्या दिवशी शपथ घेण्यास सुनेत्रा पवार तयार नव्हत्या, मात्र पक्षातील नेत्यांनी त्यांच्यावर दबाव टाकला, असा दावा रोहित पवारांनी केला आहे. या आरोपांना प्रफुल पटेल, तटकरे आणि भुजबळ यांनी तात्काळ प्रत्युत्तर दिले.

 

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

या राजकीय घडामोडींमध्ये, प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा प्रस्ताव ठेवला आणि त्या एकमताने निवडल्या गेल्या. या प्रसंगी सुनेत्रा पवार दादांच्या आठवणीने भावुक झाल्याचे दिसून आले. दरम्यान, याच अधिवेशनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेसाठी पार्थ पवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. मात्र, आईची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होत असताना आणि त्यांच्या नावाची राज्यसभेसाठी घोषणा होत असताना पार्थ पवार अधिवेशनात अनुपस्थित होते, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

 

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!