कुटुंब गाढ झोपेत असतानाच महाकाय किंग कोब्रा बेडरूममध्ये शिरला अन्… VIDEO मध्ये पुढे जे घडलं ते फार भयानक

 

 

 

Snake viral video big king cobra rescue कल्पना करा, रात्री तुम्ही शांत झोपेत आहात आणि अचानक मोठ्या आवाजाने तुमची झोपमोड होते. डोळे उघडताच समोर एक भयावह दृश्य दिसतं – एक महाकाय किंग कोब्रा तुमच्या अंथरुणाजवळ सरपटत येतोय! अशावेळी कोणाचीही झोप उडेल आणि भीतीपोटी किंचाळून माणूस दूर पळेल. अशीच एक हृदयद्रावक घटना नुकतीच एका कुटुंबासोबत घडली, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

 

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील छपरौली शहरात ही धक्कादायक घटना घडली. रात्रीच्या वेळी एक कुटुंब आपल्या बेडरूममध्ये गाढ झोपले होते. अचानक कुटुंबातील काही सदस्यांना मोठ्या फुसफुसण्याचा आवाज येऊ लागला. या आवाजाने त्यांना जाग आली. जेव्हा कुटुंबातील एका सदस्याने डोळे उघडून बेडरूमचा दरवाजा उघडला, तेव्हा समोरच एक भलामोठा किंग कोब्रा फणा काढून बसलेला दिसला. हे दृश्य पाहून कुटुंबातील सदस्य प्रचंड घाबरले, कारण तो किंग कोब्रा फणा पसरवून रागाने मोठ्याने आवाज करत होता आणि हल्ल्याच्या तयारीत होता. सुदैवाने, वेळीच जाग आल्याने कुटुंबातील सदस्य बचावले.

 

 

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

यावेळी कुटुंबाप्रमुखाने मोठ्या धैर्याने कुटुंबातील सर्वांना हळूहळू सुरक्षितपणे खोलीतून बाहेर काढले. त्यानंतर तात्काळ बचाव पथकाला बोलावण्यात आले आणि त्यांनी किंग कोब्राला सुरक्षितपणे ताब्यात घेतले. हा व्हिडीओ पाहणाऱ्या अनेकांना धक्का बसला आहे.

 

 

जर या कोब्राने कोणाला दंश केला असता, तर त्यांचा मृत्यू निश्चित होता, अशी भीती अनेकांनी व्यक्त केली आहे. पावसाळ्यात साप कोरड्या जागेच्या शोधात बाहेर पडतात, त्यामुळे सर्वांनी सावधगिरी बाळगावी आणि सतर्क राहावे, अशा प्रतिक्रियाही अनेक जण देत आहेत.

 

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

किंग कोब्राचा हा थरारक व्हिडीओ @hindipatrakar नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “काल रात्री बागपतमधील एका घरात एक कोब्रा साप शिरला. त्याच्या फुसफुसण्याचा आवाज इतका मोठा होता की, आत झोपलेल्या लोकांना लगेच जाग आली.”

 

https://x.com/hindipatrakar/status/1943134661405811172

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!