IMG 20241117 104344

10वी 12वी बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर..|

 

 

 ssc hsc exam इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा ११ फेब्रुवारीपासून तर दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरु करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. परीक्षेची सुरवात त्याच तारखेला होणार आहे, पण काही विषयांचे पेपर स्थानिक सुट्टीच्या दिवशी किंवा ‘सीबीएसई’च्या पेपरवेळी आहेत का, याची पडताळणी केली जात आहे. त्यानंतर संपूर्ण विषयांचे वेळापत्रक जाहीर होईल, असे बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

10वी-12वी परीक्षांचे वेळापत्रक पाहण्यासाठी

 

येथे क्लिक करा

 

बारावीची परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना जेईई, नीट परीक्षेची तयारी करता येणार आहे. इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया देखील वेळेत सुरु करता येणार आहे. याशिवाय अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा देखील वेळेत घेता येईल आणि त्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश देखील मिळणे सोयीचे होणार आहे. श्रेणी सुधारसाठी देखील विद्यार्थ्याला लवकर संधी मिळेल व पुढील प्रवेश त्यांचाही सोयीस्कर होईल. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आगामी परीक्षा पूर्वपिक्षा १० दिवस अगोदर घेण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाने जाहीर केलेल्या तात्पुरत्या वेळापत्रकावर विद्यार्थी, पालकांच्या हरकती, सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यावर केवळ ४० हरकती तथा सूचना बोर्डाला प्राप्त झाल्या असून त्याही किरकोळ स्वरुपाच्या असल्याने बोर्डाने तेच वेळापत्रक अंतिम करण्याचा निर्णय घेतल्याचेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

.

👉🏻अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈🏻

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!