दहावी बारावीचे हॉल तिकीट जाहीर येथे डाऊनलोड करा..!ssc hsc timetable..|
विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष म्हणजे बारावी. बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी – मार्चमध्ये होणार आहेत. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती समोर आलेली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र आजपासून म्हणजेच 10 जानेवारी पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
ही प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार आहेत. त्यासाठी www.mahahsscboard.in ही लिंक देण्यात आलेली आहे. या लिंकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपले प्रवेश पत्र डाऊनलोड करता येणार आहेत. या संदर्भात काही तांत्रिक अडचणी आल्यास माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन राज्य मंडळाकडून करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा