Sunetra Pawar : सुनेत्रा पवार पहिल्यांदाच पत्रकार परिषदेत बोलल्या, म्हणाल्या, ‘यंदाचा अर्थसंकल्प अजित दादांचा 12 वा अर्थसंकल्प ठरला असता, पण…’
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारची पत्रकार परिषद पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी सर्वात आधी सुनेत्रा पवार यांनी भूमिका मांडली Sunetra Pawar
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारकडून आज चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. चहापानाच्या कार्यक्रमाआधी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर चहापानाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी सर्वात आधी सुनेत्रा पवार यांनी भूमिका मांडली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच पत्रकार परिषदेला सामोरे गेल्या. यावेळी त्यांनी मुद्देसूद भूमिका मांडली.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा