बाळकृष्ण दोड्डी, सराटीतीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या बहिणीने यापूर्वी अनेकदा पंढरपूरची वारी केली आहे. मीही यंदा वारीत जाईन, असा हट्ट धरणाऱ्या एका वीसवर्षीय युवकाने संत तुकाराम महाराज पालखीत सहभागही घेतला. रोजच्या भजन-कीर्तनात उत्साहाने सहभाग घ्यायचा. रात्री उशिरापर्यंत सर्वासमोर नाचायचा. अकलूज जवळच्या सराटी गावाजवळ नीरा नदीत मंगळवारी पहाटे सकाळी स्नान करताना नदीच्या बोऱ्यात सापडून त्या उत्साही अन् चपळ युवकाचा अंत झाला. विशेष म्हणजे, त्याचा मृतदेह नदीच्या प्रवाहासोबत वाहून गेला. नदीत वाहून जाणाऱ्या आपल्या नातवाकडे पाहून त्याची आजी एकच टाहो फोडला. टाहो फोडणाऱ्या आजीचा आवाज ऐकून पुलावरून जाणाऱ्या वारकऱ्यांचे पाय थांबले. त्यांचेही डोळे पाणावले.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
गोविंद हा फरागबाई कराबे यांच्या लेकीचा मुलगा असून तो यंदाच्या वारीत पहिल्यांदाच सहभागी झाला. गोविंद हा नर्मदा कल्याण फोके यांचा एकुलता एक मुलगा असून, फोके परिवारातील सर्वजण शेती करतात. १८ जूनपासून श्री देवराबुवा हादगावकर दिंडी क्रमांक १२ (संत तुकाराम महाराज पालखी रथामागे) मध्ये तो सहभाग झालेला होता.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा