काळजाला हादरवणारा व्हिडिओ: वॉकरवरील बाळ थेट पायऱ्यांवर, पुढचं दृश्य अंगावर शहारे आणणारे!
सध्या सोशल मीडियावर एक अंगावर शहारे आणणारा सीसीटीव्ही व्हिडीओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका लहान बाळाला वॉकरवरून अपार्टमेंटच्या पायऱ्यांवरून खाली कोसळताना पाहायला मिळते. ही घटना एका निवासी इमारतीतील सुरक्षा कॅमेऱ्यात कैद झाली असून, bhavvc नावाच्या इंस्टाग्राम युजरने तो शेअर केला आहे. लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून, अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
नेमकं काय घडलं व्हिडीओत?
व्हिडीओमध्ये एक तरुणी एका बाळाला घेऊन पायऱ्यांखाली उतरताना दिसते. त्याचवेळी, दुसरी एक मुलगी घरातून बाहेर येते आणि दुसऱ्या घराकडे निघते. त्या मागोमाग वॉकरमध्ये असलेले बाळही घराबाहेर येते. मात्र, ते त्या मुलीच्या मागे न जाता थेट पायऱ्यांच्या दिशेने वळते आणि काही क्षणांतच वॉकरसह पायऱ्यांवरून खाली कोसळते.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी पालकांवर टीका केली आहे. काहींनी म्हटले की, इतक्या लहान बाळाला असुरक्षितपणे वॉकरवर सोडणे ही जबाबदारीशून्य कृती आहे. एका युजरने लिहिले, “अशा अपार्टमेंटमध्ये लहान बाळाला वॉकरवर कसे सोडू शकता?” दुसऱ्याने म्हटले, “डॉक्टर सतत सांगतात की वॉकरमध्ये बाळाला एकटं सोडू नका, हे त्याचं उदाहरण आहे.”