पिंपरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूनंतर धक्कादायक माहिती समोर येत आहे. वैष्णवीचा तिच्या सासरच्यांनी मानसिक आणि शारीरिक छळ केला होता. या छळाला कंटाळून तिने गळफास लावून जीवन संपवलं आहे, असा आरोप वैष्णवीच्या कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, वैष्णवीच्या कुटुंबीयांनी आता ही आत्महत्या नसून, हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या घरचे रुग्णालयात गेले असता, ‘आमच्या मुलीला काय झालं?’ असं विचारलं असता, त्यांच्या जावयाने, ‘तुझ्या मुलीला मारून टाकलं,’ असं उत्तर दिलं, ज्यामुळे वैष्णवीचे घरचे हादरले.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
वैष्णवी आणि तिचा नवरा यांच्यात सतत भांडण होत असे. सासू तिला अतोनात छळायची. वैष्णवीच्या सासरची मंडळी तिला सतत मारहाण करून माहेरी पाठवून द्यायची आणि पैशांची मागणी करत असे. काही दिवस वैष्णवीचे वडील आपल्या मुलीची समजूत काढून तिला सासरी पाठवून द्यायचे. लेकीला त्रास नको म्हणून त्यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या, परंतु ज्यावेळी २ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली, तेव्हा त्यांनी नकार दिला. त्यानंतर वैष्णवीचा जास्तच छळ करण्यास त्यांनी सुरुवात केली, असं सांगताना वैष्णवीच्या वडिलांना रडू आवरेना.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
वैष्णवीचे वडील म्हणाले की, ‘१६ मे रोजी वैष्णवीच्या नवऱ्याने फोन करून ‘तुमच्या मुलीला घेऊन जा’ असं सांगितलं होतं. त्यानंतर काय झालं हे विचारण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी फोन केले, मात्र सासरी कोणीही उत्तर दिले नाही. दुपारी साडेचार वाजता वैष्णवीच्या नवऱ्यानं फोन करून ‘वैष्णवीने गळफास घेतला असून, तुम्ही चेलाराम हॉस्पिटल बावधन येथे या’ असं सांगितलं. त्यामुळे वैष्णवीचे वडील आणि त्यांचे नातेवाईक चेलाराम हॉस्पिटलमध्ये पोहोचले असता, त्यांची मुलगी वैष्णवी बेशुद्ध अवस्थेत बेडवर पडलेली होती.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
वैष्णवीच्या वडिलांनी आणि त्यांचे दाजी उत्तम बहिरट यांनी डॉक्टरांना भेटून वैष्णवीच्या तब्येतीबाबत विचारपूस केली असता, डॉक्टरांनी त्यांना सांगितले की, ‘पेशंटचा उपचार करण्यापूर्वीच मृत्यू झाला असून तिच्या शरिरावर मारहाणीच्या खुणा दिसत आहेत.’ हे ऐकून वैष्णवीच्या वडिलांना मोठा धक्का बसला. त्यांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी वैष्णवीच्या अंगावरील मारहाणीच्या खुणा पाहिल्या असता, तिचे दोन्ही हातांवर, दोन्ही मांडीवर, पायांवर, पाठीवर, डोक्यावर जखमेच्या खुणा तसेच गळ्याच्या हनुवटीवर कसलातरी लालसर वण दिसून आला.
https://youtu.be/wGgU-_PRhhY?si=0arC9ljm3Ktkp9rE