Video डोंबिवलीतील एका विद्यार्थ्याचा लोकल ट्रेनमधून पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. विशेष म्हणेज 12 वी (HSC) बोर्डाची परीक्षा सुरू झाली, त्याचदिवशी आपला पहिला पेपर देण्यासाठी निघालेल्या युवकाचा लोकलमधून (Accident) पडून मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होता. मुंबईतील ही घटना ताजी असतानाच आता नागपूरमध्येही 12 वीच्या विद्यार्थीनीचे अपघाते निधन झाले आहे. शहराच्या मोहपा रोडवरील एमआयडीसी पुलाजवळ भीषण अपघातातात या विद्यार्थिनीसह तिच्या वडिलांचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. या घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
हिचा एमआयडीसी पुलाजवळ झालेल्या अपघाताच जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालवणारे तिचे वडील सुभाष भिवणकर यांचाही घटनास्थळी अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्नवी आणि तेच वडिल दुचाकीवरुन जात असताना भरधावपणे विरुद्ध दिशेने येणाऱ्या गिट्टीच्या ट्रकची दुचाकीला जोरदार धडक बसली. या अपघातात वडिल आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला तर वंशिका नरुळे ही तरुणी गंभीर जखमी झाला असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताच्या या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी ट्रक चालकाला पकडून मारहाण केली. तसेच, ट्रकच्या केबिनला आग लावून घटनास्थळी दगडफेकही करण्यात आली. या दगडफेकीत पोलीस वाहनाचे नुकसान झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी, ट्रकचालक प्रफुल भोयरला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून उमरेड पोलिसांत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
डोंबिवली येथील रहिवासी असलेल्या सोहम कटरे या विद्यार्थ्याचा लोकल ट्रेनमधून पडून अपघाती मृत्यू झाला. ही घटना कळवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान घडली असून,या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर, “दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही धैर्यानं उभं राहणं कसं असतं, याचं जिवंत उदाहरण भंडारा जिल्ह्यातूनं समोर आलं. एका बाजूला वडिलांचं पार्थिव घरात पडलेलं, नातेवाइकांचा आक्रोश…, पण दुसरीकडे आयुष्याचं वळण ठरवणारी बारावीची परीक्षा. काळजावर दगड ठेवून एका लेकीनं आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी थेट परीक्षा केंद्र गाठलं.” हा प्रसंग घडला 10 फेब्रुवारी रोजी 12 वीच्या परीक्षेच्या पहिल्या दिवशी, भंडाऱ्याच्या तुमसर येथील परीक्षा केंद्रावर.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा