कारचालकाने प्रवाश्याला बोनेटवरून फरफटत नेलं अन्…; पाहा हायवेवरील थरारक VIDEO

 

 

viral highway video : मुंबईतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर एक धक्कादायक घटना घडली आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबई एअरपोर्ट ते विलेपार्लेदरम्यान एका कॅबचालकाने एका व्यक्तीला आपल्या कारच्या बोनेटवरून फरफटत नेले. याप्रकरणी मुंबई एअरपोर्ट पोलिसांनी कॅब चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळाच्या डोमेस्टिक टर्मिनलबाहेर कॅबचालक आणि एका व्यक्तीमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर चालकाने त्या व्यक्तीला धक्काबुक्की केली आणि कॅब घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या व्यक्तीने चालकाला पकडण्यासाठी थेट कॅबच्या बोनेटवर उडी मारली. मात्र, चालकाने गाडी थांबवण्याऐवजी बोनेटवर असलेल्या त्या व्यक्तीला काही अंतर फरफटत नेले

 

 

 

 व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

 

व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, एक एर्टिगा कार भरधाव वेगाने धावत आहे आणि तिच्या बोनेटवर एक व्यक्ती जीव मुठीत घेऊन लटकलेली आहे. चालक गाडीचा वेग कमी करण्याऐवजी तो आणखी वाढवत होता, जणू काही एखाद्या ॲक्शन चित्रपटातील दृश्य सुरू आहे. मागून येणाऱ्या एका बाईकस्वाराने ही संपूर्ण घटना आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद केली. व्हिडिओमध्ये कारचा वेग धोकादायकपणे वाढत असल्याचे दिसत आहे आणि बोनेटवरची व्यक्ती कोणत्याही प्रकारे लटकून राहण्याचा प्रयत्न करत आहे.

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

https://x.com/MumbaiPolice/status/1927926340000395506

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!