सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडिओ व्हायरल होतात. काही व्हिडिओ मनोरंजनात्मक असतात, तर काही थक्क करणारे असतात. सध्या अशाच एका व्हिडिओने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडिओत एक गरुड थेट एका चिमुकल्यावर झडप घालताना दिसतो, हे दृश्य पाहून अनेक जण अवाक झाले आहेत.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
व्हिडिओमध्ये नेमके काय दिसते?या व्हिडिओत एक लहान मुलगा तलावाच्या काठावर उभा आहे. अचानक आकाशातून एक गरुड झपाट्याने खाली येतो आणि त्या मुलाला आपल्या तीक्ष्ण पंजांनी पकडण्याचा प्रयत्न करतो. त्या क्षणी मुलाच्या वडिलांनी प्रसंगावधान राखत धावत येऊन त्याला गरुडाच्या पकडीतून सोडवले. काही क्षणांचा हा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि तो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा