देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ग्राहकांसाठी अवघ्या एका क्लिकवर वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देणार आहे. ग्राहकांना कोणत्याही कागदपत्रांशिवाय 35 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज (Personal Loan) घेता येणार असल्याचे बँकेने म्हटले आहे. बॅंकेच्या योनो अॅपवर रिअल टाइम एक्सप्रेस
क्रेडिट योजना सादर केली आहे. ग्राहकांना कर्जासाठी बॅंकेत जाण्याची गरज नाही.पात्र ग्राहकांना आता योनो अॅपवर (YONO App) ग्राहकांना वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी एसबीआय बँकेच्या कोणत्याही शाखेत जावे लागू नये, यासाठी त्यांना सुविधा आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम बनविणे या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. एसबीआय रिअल टाइम एक्सप्रेस क्रेडिटवरील (RTXC) पर्सनल लोन फीचर पगारदार ग्राहकांना उपलब्ध आहे. ज्यांचे बॅंकेत वेतन खाते आहे, ते या कर्जासाठी पात्र आहे. कर्ज सुलभतेसाठी पात्रता, क्रेडिट चेक, कागदपत्रे आणि इतर प्रक्रिया डिजिटल पद्धतीने केल्या जातील.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा