महत्त्वाची बातमी दहावी आणि बारावी च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर…!SSC HSC board exam timetable…|

 

 

SSC HSC board exam timetable महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, आणि कोकण या नऊ विभागांतून दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या १२वीची परीक्षा फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आणि १०वीची परीक्षा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेतली जाते. या परीक्षांचे ऑनलाइन निकाल अनुक्रमे मे अखेरीस आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतात.

 

वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

 

अनुत्तीर्ण आणि श्रेणी सुधारासाठी जुलै-ऑगस्टमध्ये घेतली जाणारी पुरवणी परीक्षा साधारणतः जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होते.विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक वर्ष वेळेवर सुरू होणे, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांसाठी पुरेसा वेळ मिळणे, आणि पुरवणी परीक्षांचे निकाल लवकर जाहीर होणे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, २०२५ साली फेब्रुवारी-मार्चमध्ये होणारी १२वी आणि १०वीची परीक्षा नेहमीपेक्षा ८ ते १० दिवस आधी घेण्याचा मंडळाचा विचार आहे. यासाठी लेखी, प्रात्यक्षिक आणि इतर परीक्षा नियोजित तारखांना घेण्यात येणार आहेत.

 

 

वेळापत्रक पाहण्यासाठी येथेक्लिक करा 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!