चक्क डांबरात अडकला साप; तडफडत असताना लोकांनी काय केलं पाहाच, अंगावर काटा आणणारा VIDEO

 

 

 

 

Snake viral video साप म्हटलं की अनेकांच्या मनात धडकी भरते. त्यातही जर तो विषारी असेल, तर भीती आणखी वाढते. सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, त्यापैकी काही तर काळजाचा ठोका चुकवणारे असतात. सध्या सांगलीतील असाच एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, जिथे एक अत्यंत विषारी घोणस साप चक्क डांबरात अडकून पडला होता.

 

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

हा व्हिडिओ सांगलीतील आकाशवाणीजवळचा आहे. घोणस हा अत्यंत विषारी आणि रागीट प्रजातीचा साप मानला जातो. डांबर किती चिकट असते, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. एकदा का त्यात काही अडकले, की त्यातून सुटका करून घेणे खूप कठीण होते. या व्हिडिओमध्ये दिसतंय की, हा घोणस साप डांबरात पूर्णपणे फसलेला होता आणि बाहेर पडण्यासाठी धडपड करत होता.

 

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

सापाला या अवस्थेत पाहून सर्पमित्र आणि स्थानिक नागरिकांनी त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यांनी तेल आणि पाईपचा वापर करून सापाला डांबरातून बाहेर काढले. त्यानंतर त्याच्या शरीरावर लागलेले सर्व डांबर काळजीपूर्वक काढले आणि त्याला सुरक्षितपणे जंगलात सोडून दिले.

 

हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे आणि यावर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. एका वापरकर्त्याने “अत्यंत विषारी व तेवढंच रागीट सर्प प्रजाती घोणस जो थोडक्यात यमराज” अशी प्रतिक्रिया दिली आहे, तर दुसऱ्याने “याला वाचवणे म्हणजे लोकांचे प्राण धोक्यात घालणे” असे म्हटले आहे. आणखी एकाने “चावला की दोन मिनिटांत माणूस मरतोय. त्याला वाचवून काय उपयोग” अशी विचारणा केली आहे.

 

 

या घटनेने पुन्हा एकदा मनुष्य आणि वन्यजीव यांच्यातील सहजीवनाच्या गरजेवर प्रकाश टाकला आहे. तुम्हाला काय वाटतं, अशा परिस्थितीत वन्यजीवांना मदत करणे योग्य आहे का?

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!