लाडकी बहिण योजना 2100 रुपये 1ली लाभार्थी यादी जाहीर

 

 

 

 

ladki bahin yojana महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी अत्यंत लोकप्रिय ठरली आहे. या योजनेतून दरमहा ₹1,500 थेट बँक खात्यात जमा केले जातात. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, राज्य सरकारने ही रक्कम ₹2,100 पर्यंत वाढवण्याचे आणि नंतर ₹3,000 पर्यंत नेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सध्या ₹2,100 वाढवण्याबाबत कोणतीही हालचाल दिसत नाही, ज्यामुळे लाभाथीर्ंमध्ये उत्सुकता आहे.

 

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

पडताळणी मोहीम आणि अपात्रता निकष

 

सध्या योजनेच्या लाभाथीर्ंची पडताळणी सुरू झाल्याने महिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पडताळणीमध्ये मुख्यतः चारचाकी वाहन असणाऱ्या, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या किंवा नमो शक्ती योजनेच्या लाभाथीर्ंची नावे वगळण्यात येत आहेत. पूर्वीच घोषित केल्यानुसार, ज्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे, त्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तरीही काही महिलांनी अर्ज भरले होते आणि आता त्यांची नावे अपात्रतेच्या यादीत समाविष्ट केली जात आहेत.

 

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

 

योजनेचा लाभ घेण्यासाठी, महिलांचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी असावे आणि त्यांना इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसावा, असे नियम आहेत. राज्य सरकारने केलेल्या पडताळणीत आतापर्यंत 5.40 लाख अपात्र महिलांची नावे समोर आली आहेत.

 

आर्थिक भार आणि इतर योजनांवरील परिणाम

 

सध्या या योजनेचे सुमारे 2.59 कोटी लाभाथीर् आहेत. या महिलांना दरमहा ₹1,500 देण्यासाठी सरकारला ₹385 कोटी खर्च करावे लागतात. पडताळणी मोहीम किती दिवस चालेल, याबाबत सरकारने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबाबतही अनिश्चितता आहे. शासनाने अंगणवाडी सेविकांकडे याद्या दिल्या असून, त्यांना आठ दिवसांत अहवाल सादर करायचा आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच फेब्रुवारीचे पैसे मिळण्याची शक्यता आहे.

 

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!